मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या फिटनेसबाबत खूप शिस्तप्रिय आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दीपिकाला खाण्यापिण्याची खूप आवड आहे. फूडी असूनही मस्तानी तिची फिगर आणि वजन दोन्ही व्यवस्थित सांभाळते. मात्र, यामागे तिची मेहनत आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी ती काही खास डाएट प्लॅन फॉलो करते. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोण तिची Dietician पूजा माखिजाच्या सगळं काही पाळते.
Deepika Padukone is a big Foodi : अभिनेत्री दीपिका पदुकोण, जिने अभिनयाबरोबरच आपल्या सौंदर्याने आणि फिटनेसने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. तिला आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड करायला आवडत नाही. दीपिकाला पास्ता, चायनीज फूड आणि इंडियन फूड, विशेषत: घरी बनवलेलं मसूर आणि भात खायला आवडतो. दुसरीकडे, स्ट्रीट फूडचा विचार केला तर दीपिकाला शेव पुरी आवडते.
Deepika Padukone Secret Diet: दीपिका पदुकोण कठोर आहार पाळते. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका सकाळी उठते आणि 1 ग्लास कोमट पाणी पिते.
नाश्ता : दीपिकाला कमी चरबीयुक्त दूध, अंड्याचा पांढरा भाग किंवा उपमा, डोसा किंवा इडली साऊथ इंडियन पदार्थ खायला आवडतात.
दुपारचं जेवण: दुपारच्या जेवणात दीपिकाला रोटी, भाज्या, कोशिंबीर आणि ग्रील्ड फिश खायला आवडतं.
रात्रीचे जेवण: रात्रीच्या जेवणात अभिनेत्री सलाद, रोटी आणि भाज्या घेते. याशिवाय, दीपिका दर दोन तासांनी काहीतरी हेल्थी खाते, ज्यात नट्स, ताजी फळे, नारळाचं पाणी, फ्रूट ज्यूस यांचा समावेश आहे.
डेजर्टः दीपिका एक डार्क चॉकलेट व्यसनी आहे, जेव्हा जेव्हा तिला असं वाटतं तेव्हा ती हे खाण्यास लाजत नाही.