...म्हणून दीपिकाने अनिल कपूरची मागितील माफी

पाहा का मागावी लागली दीपिकाला माफी

Updated: May 27, 2018, 02:19 PM IST
...म्हणून दीपिकाने अनिल कपूरची मागितील माफी title=

मुंबई : काही दिवसांपूर्वीच सोनम कपूर आणि आनंद आहूजा यांचा विवाह पार पडला. सोनमच्या लग्नाच्या चर्चा सगळीकडेच होत्या. सोनमने आनंद आहूजा याच्या सोबत विवाह केला. विवाहानंतर सोनमने एक शानदार रिसेप्शन देखील दिलं होतं.  या विवाहात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. दीपिकाला देखील या लग्नाचं आमंत्रण होतं पण ती पोहोचू शकली नव्हती.

दीपिका लग्नादरम्यान कान्समध्ये होती. दीपिकाने सोनमचे वडील अनिल कपूर यांच्याकडे यासाठी माफी मागितली. जीक्यू अवॉर्ड्स दरम्यान दीपिका आणि अनिल कपूर यांची भेट झाली. दीपिकाने अनिल कपूर यांना हग केलं. त्यानंतर त्यांची माफी मागितली. अनिल कपूरने म्हटलं की, 'दीपिका तुला मिस केलं.' यावर दीपिकाने म्हटलं की, 'मला कल्पना आहे म्हणून मी सॉरी म्हणते आहे. त्यावेळी मी कान्समध्ये होती.' पण या विवाहात दीपिकाचा बॉयफ्रेंड रणवीर सिंगने हजेरी लावली होती.