मुंबई : पद्मावत हा सिनेमा वाद विवादांचा अडथळा पार करून आता सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात शाहीद कपूर, रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोणच्या मुख्य भूमिकेतील चित्रपटाने बॉक्सऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
जसा बॉलिवूडचा दबंग सलामान खान 300 कोटींच्या क्लबचा राजा आहेत तशी दीपिका आता 100 कोटी क्लबची राणी झाली आहे. पद्मावतच्या यशानंतर दीपिकाचे 7 चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाल्याचे चित्र आहे. 'पद्मावत' वादानंतर अभिनेत्री दीपिकाने घेतला मोठा निर्णय
'चेन्नई एक्सप्रेस', 'हैप्पी न्यू ईयर', ये जवानी है दीवानी, 'बाजीराव मस्तानी', 'रामलीला', 'रेस 2' आणि 'पद्मावत' या चित्रपटाने 100 कोटी कमावले आहेत. 'पद्मावत' च्या या सीनमुळे दीपिका पदुकोण बैचेन
Deepika has emerged the undisputed Queen of 100 cr Club... #Padmaavat is @deepikapadukone’s seventh film to cross 100 cr mark [#ChennaiExpress, #HNY, #YJHD, #BajiraoMastani, #RamLeela, #Race2]... The HIGHEST by any leading lady... An enviable track record!
— taran adarsh (@taran_adarsh) January 29, 2018
दीपिका पादुकोणच्या 'पद्मावत'ची क्रेझ भारताप्रमाणेच नॉर्थ अमेरिका, जर्मनी,पाकिस्तानमध्ये दाखवण्यात आला आहे. परदेशातही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
सध्या दीपिका पादुकोण चित्रपटांशिवाय 18 विविध ब्रॅन्डला प्रमोट करत आहे. दीपिका पादूकोण, कॅटरिना कैफला मागे टाकत 'ही' अभिनेत्री ठरली सेक्सिएस्ट वूमन