कथामांडणीत खाल्ली माती, चित्रपटात चिक्कार अपशब्द असूनही बक्कळ कमाई; आठवतोय आमिरचा 'हा' सिनेमा

Delly Belly Movie News: हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत ज्यांच्यावरून बराच वादंगही माजला होता. त्यामुळे त्यांच्यावर बंदीही आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यातून आज ओटीटीमुळे हिंसा, क्राईम, सेक्स आणि अर्वाच्च शिव्या यांच्या मसाला पाहायला मिळतो. परंतु आमिर खाननं अशाच एका चित्रपटाची निर्मिती केली होती ज्यावर बरेच आक्षेप घेतले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 10, 2023, 02:00 PM IST
कथामांडणीत खाल्ली माती, चित्रपटात चिक्कार अपशब्द असूनही बक्कळ कमाई; आठवतोय आमिरचा 'हा' सिनेमा title=
August 10, 2023 | delly belly film which was successful at box office although having bad content

Delly Belly Movie News: आमिर खानचे जगभरात अनेक चाहते आहे. 2000 नंतर जग हे विस्तारू लागले होते. सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही नवे बदल होऊ लागले होते. नव्या दमाचे कलाकार आणि लेखक-दिग्दर्शक हे समोर येवू लागले होते आणि त्याचसोबत त्यांचे चित्रपटही हीट होऊ लागले होते. नव्या तरुणपिढीचे चित्रपट हे चांगलेच गाजू लागले होते. आमिर खानच्या 'दिल चाहता हैं' या चित्रपटानंही मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. त्यानंतर विविधांगी प्रयोग करू पाहणाऱ्या अभिनेता आमिर खान यानं हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे असे नावं कमावला सुरूवात केली होती. तेव्हा भारतीय चित्रपटांना परदेशी प्रेक्षकांचीही गर्दी मिळू लागली होती. तुम्हाला आठवतोय का 2011 मध्ये म्हणजेच 12 वर्षांपुर्वी आमिर खानची निर्मिती असलेला एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याची तेव्हा प्रचंड चर्चा सुरू झाली होती. तेव्हा सोशल मीडिया हे आजच्यासारखे सक्रिय नव्हते. टेलिव्हिजन चॅनलवर तेव्हा त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. 

या चित्रपटाचे नाव होते 'देली बेली'. हा चित्रपट तेव्हा प्रचंड गाजला होता. या चित्रपटाचे प्रमोशनही तेव्हा मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. हा चित्रपट खासकरून तरूणांसाठी होता. या चित्रपटातील 'भाग डीके बोस' हे गाणं प्रचंड गाजले होते. वीर दास, इमरान खान, कुणाल कपूर हे यावेळी प्रमुख भुमिकेतून प्रेक्षकांसमोर आले होते. यावेळी आमिर खानच्या भाच्याला त्यानं या चित्रपटातून घेतले होते.

परंतु त्यावेळी या चित्रपटावरून बराच वाद सुरू झाला होता. या चित्रपटात अर्वाच्च शिव्या होत्या आणि सोबतच अत्यंत अश्लील भाषाही वापरली होती. तुम्हाला आठवत असेल की तेव्हा आमिरनं तेव्हा आपल्या भाच्यासोबत एक आवाहनही केले होते. ही फिल्म अडल्ट फिल्म होती त्यामुळे जबाबदारीनं पाहण्याचेही आवाहन केले होते. यावेळी या चित्रपटातून आमिर खानं एक कॉमियो रोल केला होता. 

हेही वाचा - Big B, SRK यांची जागा घेतली आहे 'या' हिरोनं, तुम्ही त्याला ओळखलं का?

आमिर खान लवकरच एका नव्या भुमिकेतून येणार आहे. 2022 आलेल्या त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. हा चित्रपट बॉयकॉट करा इथपर्यंत या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. या चित्रपटाला विरोध करण्यामागे आमिर खानचे वक्तव्य कारणीभूत होते. त्यानं आपल्याला आणि आपल्या पत्नीला भारत देशात राहायची भिती वाटते असे म्हटले होते.