Ranveer Singh Childhood Photos: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'डॉन या चित्रपटाची. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे कारण यावेळी डॉन म्हणून रूपेरी पडद्यावर आपल्या समोर आलाय खुद्द रणवीर सिंग. 1978 साली डॉन म्हणून अमिताभ बच्चन आपल्यासमोर आले होते. त्यानंतर अभिनेता शाहरूख खान दोनदा आपल्याला यावेळी चित्रपटांतून दिसला होता. 2006 साली आणि 2011 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावेळी या दोन्ही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमावला होता. त्यासोबतच 'डॉन' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या हृदयात होती. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात हा अजरामर आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा पहिला लुक सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. यावेळी रणवीर सिंगला पाहून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. सोबतच हा चित्रपट 2025 साली सोशल मीडियावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच शिगेला गेली आहे.
रणवीर सिंग हा आपल्या सगळ्यांचाच फारच लाडका अभिनेता आहे. नुकताच त्याचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रूपयांपेक्षाही जास्त कमाई केली आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग याची जोडीही यावेळी चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. 2019 साली ते दोघं 'गल्ली बॉय' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आले होते. त्यांच्या केमेस्ट्रीला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. आता रणवीर सिंगची चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या आगामी 'डॉन' या चित्रपटामुळे. यावेळी त्यानं प्रेक्षकांसाठी एक खास पोस्टही शेअर केली आहे.
हेही वाचा - लैंगिक शिक्षणाबद्दल मुलीशी संवाद साधलाय? पंकज त्रिपाठी यांनी दिलं दोन वाक्यात उत्तर
काल 'डॉन'चा पहिला लुक हा व्हायरल झाला आहे त्यानंतर रणवीर सिंगनं आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम अकांऊटवरून त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर केला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा ही रंगलेली आहे. यावेळी त्यानं आपले तीन फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो गॉगलमध्ये दिसतो आहे आणि त्याची पोझ ही फुल स्वॅगमध्ये दिसते आहे. यावेळी त्यानं लिहिलंय की, ''Gosh! मी खूप दिवसांपासून डॉन म्हणून रूपेरी पडद्यावर येण्याचे स्वप्न पाहतो आहे. लहानपणी मी चित्रपटांच्या प्रेमात पडलो आणि आपल्या इतरांप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन G.O.A.Ts - अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना पाहणे आणि त्यांना पूजणे ही गोष्ट माझ्यासाठीही तितकीच भारी होती. मी मोठं होऊन त्यांच्यासारखेच होण्याचे स्वप्न पाहिले. त्यांच्यासारखेच मलाही एक अभिनेता आणि 'हिंदी चित्रपटाचा नायक' व्हायचे होते. माझ्या जीवनावर त्यांचा प्रभाव किती आहे हे मला सांगता येणं फारच कठीण आहे. त्यांनी माझ्यासारखाच एक अभिनेता तयार केला आहे. त्यामुळे त्यांचा वारसा पुढे नेणं हे माझे कर्तव्यचं आहे.''
'''डॉन' सिरिजचा एक भाग असणे ही किती मोठी जबाबदारी आहे हे मला समजले आहे. मला आशा आहे की याद्वारे प्रेक्षक मला एक संधी देतील आणि माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतील ज्याप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत माझ्या पात्रांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल फरहान आणि रितेशचे आभार. मला आशा आहे की मी तुमचा विश्वास आणि खात्री पूर्ण करू शकेन. माझे दोन सुपरनोवा, बिग बी आणि एसआरके; मला आशा आहे की मी तुमचा अभिमान बाळगू शकेन. आणि माझ्या प्रिय चाहत्यांनो, नेहमीप्रमाणेच, मी तुम्हाला वचन देतो...की मी तुमचं मनोरंजन करण्यासाठी...'डॉन'मध्येच काय पुढील सर्वच भुमिकांसाठी पात्र राहीन. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.''