वयाच्या ५० व्या वर्षी 'ही' अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात

अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा 

Updated: Oct 24, 2020, 05:11 PM IST
वयाच्या ५० व्या वर्षी 'ही' अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात

मुंबई : प्रेमाला वयाचं बंधन नसतं. 'तुमचं आमचं सेम' असणारं हे प्रेम कोणत्याही वयात होऊ शकतं. या प्रेमाला नात्याचं नाव देण्यासाठी 'लग्नगाठ' महत्वाची ठरते. अशीच लग्नगाठ एक अभिनेत्री वयाच्या ५० व्या वर्षी बांधणार आहे. 

अभिनेत्री डेलनाज ईरानी लवकरच बॉयफ्रेंड पर्सी कडकडियासोबत सात फेरे घेणार आहे. डेलनाजने आपण लग्न करणार असल्याची एक हिंट सोशल मीडियावर शेअर केली आहे. डेलनाज म्हणते की, आपल्या ५० व्या वाढदिवसादिवशी ती सात फेरे घेऊ शकते. मात्र याची गॅरंटी मात्र तिने दिलेली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday to the man that I wish to hold forever in my heart! The best thing in life is to find someone who knows all your flaws and still thinks you’re amazing  Wishing you all the happiness, health and love!  @djpercyofficial #birthdaywishes #lotsoflove #love #forever #mondaymuse

A post shared by Delnaaz irani (@officialdelnaazirani) on

मिळालेल्या वृत्तानुसार, डेलनाज लग्नासाठी तयार आहे. 'बाहेरच्या लोकांबद्दल तर सोडा, पण अनेकदा माझे नातेवाईकच माझ्या लग्नाबद्दल बोलत असतात.' मी लग्नाच्या विरोधात नाही पण मी आणि पर्सी एकमेकांसोबत जास्त मोकळे राहतो. आम्ही इतर लग्न झालेल्या दाम्पत्याप्रमाणे नाहीत. आमच्यासाठी लग्न हे एक कागदाचा तुकडा आहे. जिथे आम्ही सही करणार आहोत. 

आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये आहे डेलनाज आणि पर्सी 

डेलनाज सांगते की,'पर्सी शिवाय मी आता माझ्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही. त्याच्यामुळे मी पूर्ण होते. आता रिलेशनशिप ८ वर्षांच झालं आहे. माझ्यावर प्रेम करण्याव्यतिरिक्त तो माझा सांभाळ देखील करतो. जे एका महिलेसाठी खूप महत्वाचं आहे. आमचं नातं जसं आहे तसंच खूप खास आहे.'