close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'देसी गर्ल'च्या उत्तरामुळे पाकिस्तानी मंत्र्यांचा तिळपापड

मार्च महिन्यात प्रियांकाने ट्विटरच्या माध्यमातून भारतीय सेनेचं कौतुक केले होते. 

Updated: Aug 14, 2019, 01:33 PM IST
'देसी गर्ल'च्या उत्तरामुळे पाकिस्तानी मंत्र्यांचा तिळपापड

मुंबई : जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तीमत्व असलेली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. ती प्रसिद्ध व्यक्तीमत्वासह संयुक्त राष्ट्रांमध्ये सदिच्छादूत आहे. शनिवारी दुपारी ब्यूटीकॉल लॉस एंजेलिसमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचदरम्यान एक पाकिस्तानी युवती तिच्यावर ओरडली. पण संयम बाळगत प्रियांकाने परिस्थिती योग्य रितीने सावरली. परंतू या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सदिच्छादूत पदावरून प्रियांकाला काढण्याची मागणी केली. 

मार्च महिन्यात प्रियांकाने ट्विटरच्या माध्यमातून भारतीय सेनेचं कौतुक केले होते. त्यामुळे उपस्थित पाकिस्तानी मुलीला तिचा राग अनावर झाला आणि ती प्रियांकावर ओरडली. प्रियांका संयुक्त राष्ट्रांमध्ये सदिच्छादूत आहे. त्यामुळे पाकिस्तानी मुलीने तिने केलेल्या ट्विटवर आक्षेप घेतला. त्या पाकिस्तानी युवतीचे नाव आयशा मलिक असल्याचे समोर येत आहे. 

तू देशात शांतता प्रस्तापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेत सदिच्छादूत आहेस. तू पाकिस्तानात आण्विक युद्धाला दुजोरा देत आहेस. पाकिस्तानातील लाखो नागरिक तुझे चाहते आहेत.' असे वक्यव्या पाकिस्तानी मुलगी आयशा मलिकने केले होते. 

'माझे अनेक मित्रमंडळी हे पाकिस्तानचे रहिवासी आहेत आणि मी एक भारतीय नागरीक आहेत. युद्ध ही एक अशी गोष्ट आहे जी मला अजिबात आवडत नाही. मी एक राष्ट्रभक्त आहे.' असं म्हणत ज्यांची भावना दुखावली गेली त्यांची माफी सुद्धा प्रियांकाने मागीतली होती. आता हे प्रकरण कोणते रूप घेईल हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.