देव आनंद यांनी 'गाईड' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान का घेतली होती एवढी मोठी रिस्क?

पत्रकार ते लेखिका बनलेल्या रोशमिला भट्टाचार्य यांच्या 'मॅटिने मेन' यांच्या पुस्तकाविषयी बरचं काही

Updated: May 12, 2021, 01:16 PM IST
देव आनंद यांनी 'गाईड' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान का घेतली होती एवढी मोठी रिस्क? title=

मुंबई : पत्रकार ते लेखिका बनलेल्या रोशमिला भट्टाचार्य यांच्या 'मॅटिने मेन' या पुस्तकाचं गेल्यावर्षी प्रकाशन झालं होतं. त्यानंतर हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे. या पुस्तकाची खास गोष्ट म्हणजे त्यात बॉलिवूडशी संबंधित सर्व किस्से आहेत, जे फार कमी लोकांना ठाऊक आहेत. या पुस्तकात बर्‍याच स्टार्सच्या मुलाखतीही आहेत. ज्यामध्ये अशोक कुमार, दिलीप कुमार, देव आनंद, शम्मी कपूर, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, फारूक शेख, मिथुन चक्रवर्ती, जॉन अब्राहम, आमिर खान, शाहरुख, सलमान आणि इरफान यांचा समावेश आहे. या पुस्तकात  देव आनंद यांच्याशी संबंधित एक किस्सा नमूद केला आहे. जो खूप आश्चर्यकारक आहे.

रोशमिला भट्टाचार्य यांनी लिहिलंय की, जेव्हा देव आनंद यांचा प्रसिद्ध चित्रपट 'गाईड'चं शूटिंग उदयपुरात सुरू होतं. तेव्हा त्या काळात खरा गाईड तिथे पोहोचू शकला नाही. त्यावेळी शूटिंग रद्द करण्यात काहिच अर्थ नव्हता. त्या दिवसांत देव आनंद यांनी गावातील काही लोकांना नावेत बसवलं आणि सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं.  

हा चित्रपट अमेरिकन-भारतीय प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनविला जाणार होता. मात्र देव आनंद यांनी स्वत: ही जोखीम स्वत:च्या रिस्कवर घेतली. जी त्यांच्यासाठी अत्यंत प्राणघातकही होती. पण देव आनंद हे फक्त सिनेमाचे स्टार नव्हते. त्यांनी खऱ्या आयुष्यातही जोखीम घेणं शिकलं होतं. याबद्दलची संपूर्ण माहिती या पुस्तकात लिहीली आहे.

या पुस्तकात जॉन अब्राहमचा देखील उल्लेख आहे. या पुस्तकात लिहिलं आहे की, जॉनने बी.ए. मध्ये इकॉनॉमिक्स ऑनर्स केलं आहे. पण नंतर त्याने मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि त्याच्या काही काळानंतर त्याने फ्रॅंक काफ्का उत्तम प्रकारे वाचलं आणि मग तो वर्ल्ड अफेयरच्या बाबतीत खूप मोठा झाला.

यानंतर, जॉनने चित्रपटात पदार्पण केलं आणि काही दिवसातच त्याच्या बॉडी आणि उत्कृष्ट अभिनयामुळे बॉलिवूडच्या डॅशिंग हिरोच्या यादीमध्ये तो सामील झाला.