कोरोनाकाळात अभिनेत्याने चक्क 150 रुपयांत उरकलं लग्न

विराफ - सलोनी लग्नाची जोरदार चर्चा 

Updated: May 12, 2021, 12:37 PM IST
कोरोनाकाळात अभिनेत्याने चक्क 150 रुपयांत उरकलं लग्न

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता विराफ पटेलने अभिनेत्री सलोनी खन्नासोबत लग्न केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी मुंबईतील वांद्रे येथील कोर्ट मॅरेज केलं आहे. 'एक बूंद इश्क' आणि 'नामकरण' अभिनेता विराफ पटेलने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सलोनीसोबत साखरपुडा केला आहे. दोघांची भेट दोन वर्षांपूर्वी एका ऑनलाईन शो दरम्यान झाली. यानंतर दोघं एकमेकांना डेट करत होते. 

विराफने एका मुलाखती दरम्यान सांगितलं की,'या लग्नात दोघांचे कुटुंबिय झूम मीटिंगद्वारे उपस्थित होते. खूप दिवसांपासून आम्ही लग्न करण्याचा विचार करत होतो. मात्र आताची परिस्थिती पाहता आम्ही कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेतला. या परिस्थितीत तेच करण योग्य आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viraf Patell (@virafpp)

पुढे विराफ म्हणाला की,'लग्न करण्यामागचा एकच उद्देश होता की, आम्ही पुढचं आयुष्य एकत्र घालवू इच्छितो. आशा आहे आम्हाला आमचं लग्न खूप यशस्वी होईल. आमच्या आयुष्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत.' खास गोष्ट अशी होती की अंगठ्यांच्या जागी यांनी रबर बँड घातली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viraf Patell (@virafpp)

या प्रकरणाबाबत अभिनेता सांगतो की,'आता कोरोनाचा काळ सुरू आहे. सगळंच बंद आहे. अशा परिस्थितीत आम्ही जुगाड केला आहे. सलोनीने मला याबद्दल मारलं नाही.' लग्नानंतर या दोघांची खूप चर्चा झाली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट खूप व्हायरल झाली. 

सलोनी खन्ना पंजाबी असून विराफ पटेल पारसी आहे. दोघं ही वेगवेगळ्या धर्माशी संबंधित आहेत. मात्र ते दोघं एकमेकांचा सन्मान करतात आणि प्रेमही करतात. दोघांनी एकमेकांनी संस्कृती स्विकारली आहे. विराफने एका मुलाखतीत सांगितलं की,'आम्हाला जेवायला आवडतं. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण घरातच राहतो.'