मेहंदी, हळदीचे फोटो एकासोबत आणि लग्न दुसऱ्यासोबतच; 'गोपी बहू'ने चाहत्यांना केलं हैराण!

Devoleena Bhattacharjee चे लग्नाचे आणि हळदीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Dec 16, 2022, 01:12 PM IST
मेहंदी, हळदीचे फोटो एकासोबत आणि लग्न दुसऱ्यासोबतच; 'गोपी बहू'ने चाहत्यांना केलं हैराण! title=

Devoleena Bhattacharjee's Marriage :  झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या  लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya)  मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ने मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जीम ट्रेनर शहनवाज शेखसोबत सप्तपदी घेतल्या. मात्र, त्या आधी सोशल मीडियावर एकच चर्चा होती की देवोलीना ही तिच्या सहकारासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. 

देवोलीनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. दरम्यान, देवोलीनानं शेअर करण्याआधीच तिचा 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील तिचा सहकलाकार विशाल सिंगनं (Vishal Singh) त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. त्या दोघांमध्ये असलेली जवळीकता पाहून सगळ्यांना वाटले की त्यांचेच लग्न आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, या आधी देवोलीना आणि विशालनं त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र, त्यावेळी त्यांचे लग्न झाले नव्हते तर त्यांचे एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार होतं. देवोलीना आणि विशालमध्ये असलेली जवळीकता पाहता ते दोघे मित्र नाहीत असे नेहमी अनेकांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर ते दोघं रिलेशनशिपमध्ये असून ते फक्त जगापासून या विषयी लपवत आहेत. (Devoleena Bhattacharjee really gots married to her gym trainer or vishal singh netizens ask quesstion) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Devoleena नं जीम ट्रेनरशी लग्न करताच सख्खा भाऊ असं काही बोलला ज्याचा विचारही करणं कठीण!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या सगळ्यात जेव्हा देवोलीनानं शहनवाजशी लग्न केलं तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झालं. देवोलीनानं आत्तापर्यंत कोणाला तिच्या रिलेशनशिपविषयी कळू दिले नव्हते. तिनं अचानक लग्न केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्या लग्नाची तयारी सुरु असताना काही लोकांना वाटले की हा प्रॅंक आहे. तर काहींना वाटलं की साथ निभाना साथिया या मालिकेतील तिचा सहकलाकार विशाल सिंगसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. मात्र, जेव्हा देवोलीनानं लग्नानंतर तिचे शहनवाजसोबत फोटो शेअर केले होते. तर सगळ्यांना आश्चर्य झाले. रिपोर्ट्सनुसार, देवोलिना 2019  शाहनवाजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

देवोलीनानं या 'साथ निभाना साथीया' मालिकेत गोपीची भूमिका साकारली होती. नंतर, अभिनेत्रीनं 'लाल इश्क' सारख्या शो आणि 'साथ निभाना साथिया'च्या दुसऱ्या सीझनमध्ये काम केले. देवोलीना 2019 मध्ये प्रसारित झालेल्या 'बिग बॉस 13' चा देखील एक भाग होती. देवोलिना सगळ्यात शेवटची 'बिग बॉस 15' मध्ये दिसली होती.