Maharashtra Weather News : दाट धुकं अन् कडाक्याची थंडी; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये तापमानात घट?

Maharashtra Weather News : राज्यात थंडीनं पकड मजबूत केली असून, आता हीच थंडी येत्या काही दिवसांमध्ये वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.   

सायली पाटील | Updated: Nov 25, 2024, 08:08 AM IST
Maharashtra Weather News : दाट धुकं अन् कडाक्याची थंडी; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये तापमानात घट?
Maharashtra Weather news Cold wave heats Mumbai temprature drops down till 14 degrees

Maharashtra Weather News : उत्तरेकडील राज्यांमध्ये सातत्यानं वाढणाऱ्या थंडीच्या कडाक्यामुळं राज्यातही आता तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून उत्तरेकडून येणारे कोरडे वारे आणि शीतलहरी अतिशय वेगानं महाराष्ट्राच्या सीमाही ओलांडून येत असल्यामुळं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

राज्यातल सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद धुळे आणि परभणी इथं करण्यात आली असून, इथं हा आकडा 10.5 अंशांवर पोहोचला आहे. येत्या 24 तासांमध्ये तापमानात चढ- उतार अपेक्षित असून, हा सर्व उत्तर भारतातील थंडीचाच परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशातही थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. दक्षिण भारतातील किनारपट्टी क्षेत्रामध्ये पावसाचं सावट वगळता देशाच्या उर्वरित भागांमध्ये तापमानात घट नोंदवली जात आहे. 

दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हवामानातील दमटपणा कायम राहणार असून, सकाळच्या वेळी उष्मा जाणवणार आहे. पण, रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र बोचरी थंडी जाणवण्यास सुरुवात होईल. राज्याच्या घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये पहाटेच्या वेळी आणि सूर्य डोक्यावर आला तरीही धुक्याची चादर कायम राहणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर या भागांचा समावेश आहे. 

हेसुद्धा वाचा : Video : मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर डिस्नेलँडमध्ये अवतरलं परिकथेतील खरंखुरं गाव; इथं पोहोचायचा खर्च किती माहितीये?

 

मुंबईतही वाढला थंडीचा कडाका

पुढील 24 तासांमध्ये मुंबई महानगर प्रदेशाचा पारा आणखी उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामन विभागाच्या माहितीनुसार, सोमवारनंतर मुंबई शहर, ठाणे, नवी मुंबई क्षेत्रात तापमान घट नोंदवली जाईल. तर,  मंगळवारी आणि बुधवारीही तापमानात घट अपेक्षित आहे. या आठवड्याच्या अखेरीपर्यंत तरी थंडी काढता पाय घेणार नाही हेच चित्र इथं स्पष्ट होत आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More