फराह खान ''धडक'' सिनेमांतील गाणी करणार दिग्दर्शित

झिंग झिंग झिंगाट म्हणतं संपूर्ण महाराष्ट्राने सैराट सिनेमा डोक्यावर उचलून धरला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 29, 2018, 08:04 PM IST
फराह खान ''धडक'' सिनेमांतील गाणी करणार दिग्दर्शित  title=

मुंबई : झिंग झिंग झिंगाट म्हणतं संपूर्ण महाराष्ट्राने सैराट सिनेमा डोक्यावर उचलून धरला. 

आता हा सिनेमा बॉलिवूडमध्ये येत आहे धाडकच्या रुपात. करण जोहर जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांना घेऊन धडक हा सिनेमा करत आहे. सैराट सिनेमातील गाणी ही प्रत्येकाने उचलून धरली. मग तो मराठी असो वा अमराठी. सैराटमधील ही गाणी आता बॉलिवूडकरांना ठेका धरायला लावणार आहे. 

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान धडकमधील गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे झिंगाट हे गाणं नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. अजय-अतुल यांनी सैराटमधील गाण्यांना संगीत दिलं होतं. यापूर्वी अजय-अतुलच्या 'कोंबडी'च्या चालीवर 'चिकनी चमेली' हे गाणं हिंदीत गाजलं आहे. त्यामुळे 'झिंगाट'चं हिंदी व्हर्जन कसं असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. धडक 20 जुलै 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमातून श्रीदेवीची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिच्यासोबत शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर स्क्रिन शेअर करत आहे. ईशान खट्टरच्या बियॉन्ड द क्लाऊड्स या सिनेमाचे आज ट्रेलर रिलिज झाला.