Dharmendra Birthday: धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाचे हटके सेलिब्रेशन; बॉबीनं दिल खास सरप्राईज

Bobby Deol नं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Dec 8, 2022, 04:23 PM IST
Dharmendra Birthday: धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाचे हटके सेलिब्रेशन; बॉबीनं दिल खास सरप्राईज title=

Dharmendra Birthday : अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांची बॉलिवूडचा 'ही-मॅन' आणि 'अॅक्शन किंग' अशी ओळख आहे. आज धर्मेंद्र यांचा 87 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुलगा बॉबी देओलनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. बॉबीनं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

बॉबी देओलनं (Bobby Deol) त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. बॉबीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये धर्मेंद्र, सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल आणि बॉबी स्वत: दिसत आहे. ते तिघं ही पूजेला बसल्याचे पाहायला मिळत आहे. बॉबीनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये धर्मेंद्र यांनी गळ्यात फुलांचा हार घातला आहे. धर्मेंद्र हे हवन कुंडच्या समोर बसले आहेत. तर बॉबी आणि करणनं (Karan Deol)त्याचा हात पकडला आहे. हा फोटो शेअर करत बॉबी त्याच्या आणि करणकडून शुभेच्छा देत म्हणाला, तुमचा मुलगा आणि नातू आहोत यामुळे स्वत: ला आम्ही धन्य समजतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पापा. 

पाहा बॉबीची पोस्ट -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर धर्मेंद्र लवकरच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत धर्मेंद्र त्यांचा मुलगा बॉबीशी देखील बोलले होते. तेव्हा ते म्हणाले की, बेटा मला वाटलं  होते की मी वयाच्या 70 व्या वर्षापर्यंत काम करेन आणि आज मी 86 वर्षांचा आहे आणि अजूनही काम करत आहे. त्याचे वडील हे योग्य बोलत आहेत आणि त्याच्यात खूप चांगली भावना आहे आणि त्यामुळे त्याला प्रेरणा मिळते. बॉबी पुढे म्हणाला, मलाही माझ्या शेवटच्या श्व्सापर्यंत काम करायचे आहे, कारण आम्ही कलाकार आहोत, आम्हालाही असंच कायम काम करायचं आहे. (Dharmendra Birthday Bobby deol shared a special post and wished him in a different way) 

हेही वाचा : Manoj Bajpayee वर दु: खाचा डोंगर वडिलांनंतर आईचीही छत्रछाया हरपली

धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर 'शोले', 'फूल और पत्थर', 'आई मिलन की बेला', 'मेरा गाव मेरा देश', 'यादों की बारात', 'रेशम की डोरी', 'नौकर बीवी का', 'घायल' यांसारखे अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे.