Dharmendra Birthday: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे आज 8 डिसेंबर रोजी आपला 89 वा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसानिमित्त अभिनेता सनी देओल आणि मुलगी ईशा देओलने धमेंद्र यांना सोशल मीडियावर वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी मुलगी ईशा देओलने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. तर सनी देओलने काही न पाहिलेल्या फोटोंसह वडील धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंच्या रील्सच्या मागे हॅपी बर्थडे ट्यून ऐकू येत आहे.
त्यासोबत सनी देओलने हा रील्स शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'हॅपी बर्थडे पापा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो'. सनी देओलने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते देखील मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तसेच धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देत आहेत.
मुलगी ईशा देओलने वडील धर्मेंद यांना दिल्या शुभेच्छा
तर धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये घराबाहेर भिंतींवर अभिनेता धर्मेंद्र यांचे अनेक बॅनर आणि पोस्टर्स आहेत. या रील्सच्या मागे 'यमला पगला दिवाना' हे गाणं वाजत आहे. तसेच ईशा देओल ही त्या फोटोंकडे पाहत असल्याचं दिसत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'हॅपी बर्थडे पापा. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो'. तुम्ही नेहमी आनंदी आणि निरोगी रहा. धर्मेंद्र यांच्या सर्व चाहत्यांचे आभार, ज्यांनी त्यांचे इतके सुंदर पोस्टर्स आणि फोटो इथे लावले आहेत.
धर्मेंद्र यांनी मानले चाहत्यांचे आभार
आज धर्मेंद्र हे 89 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ते नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करताना धर्मेंद्र यांनी चाहत्यांना सांगितले होते की, ते आपल्या मातृभूमीत परतल्याने खूप आनंदी आहेत. आपल्या चाहत्यांचे आभार मानताना ते म्हणाले होते की, 'माझ्या वडिलांनी माझे नाव धर्मेंद्र ठेवले. पण तुम्ही लोकांनी खूप प्रेम दिले आणि मला हीमॅन बनवले.