ढिंच्याक पूजाकडून हॉलिवूड रॅपर एमिनेमचं हिट गाणं रिक्रेएट, गाणं ऐकून कान बंद करण्याची वेळ

आपल्या अनोख्या गायनाने सोशल मीडियावर व्हायरल झालेली ढिंच्याक पूजा आता पुन्हा एकदा त्याच अंदाजात परतली आहे. 

Updated: Jun 12, 2022, 06:02 PM IST
ढिंच्याक पूजाकडून हॉलिवूड रॅपर एमिनेमचं हिट गाणं रिक्रेएट, गाणं ऐकून  कान बंद करण्याची वेळ title=

मुंबई : आपल्या अनोख्या गायनाने सोशल मीडियावर व्हायरल झालेली ढिंच्याक पूजा आता पुन्हा एकदा त्याच अंदाजात परतली आहे. ढिंच्याक पूजाने तिच्या  गायकीत आणखी एक गाणं रिलीज केलं आहे. यावेळी ढिंच्याक पूजाने हॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर एमीनेमचं सुपरहिट गाणं 'लूज युवरसेल्फ' तिच्या खास शैलीत रिक्रिएट केलं आहे. बस फिर क्या था ढिंच्याक पूजाचं हे गाणे ऐकून चाहत्यांना डोकं धरायला भाग पाडलं आहे आणि ते या गाण्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

ढिंच्याक पूजाने एमिनेमच्या सुपरहिट गाण्याने धमाल केली
नुकतंच ढिंच्याक पूजाने तिच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज केलं आहे. बऱ्याच दिवसांनी ढिंच्याक पूजा गाणं घेऊन परतली आहे. हे गाणं पाहून तुम्हाला एमिनेमचा 'लूज युवरसेल्फ' नक्कीच आठवेल. कारण ढिंच्याक पूजाने या गाण्याचे बोल पूर्णपणे कॉपी केले आहेत.

इतकंच नाही तर एमिनेमने ज्या पद्धतीने हे गाणं चित्रित केलं होतं त्याच पद्धतीने तिच्या गाण्यांचं चित्रण करण्याचा ढिंच्याक पूजाने पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण एमिनेमच्या गाण्यातली एक टक्काही प्रतिमा तिला अंगीकारता आली नाही. अशा परिस्थितीत ढिंच्याक पूजाच्या या गाण्यावर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

फॅन्सने दिल्या अशा रिएक्शन
2017 मध्ये 'सेल्फी मैने ले ली यार' या गाण्याने व्हायरल झालेली ढिंचक पूजाचे हे गाणे चाहत्यांना फारसं आवडलं नाही. ढिंच्याक पूजाचा 'एमिनेम अवतार' चाहत्यांना अजिबात आवडला नाही. ढिंच्याक पूजाच्या या गाण्यावर प्रतिक्रिया देताना चाहते म्हणाले, 'अखेर तुला गाणंच कळत नाही, मग तू का गातेस. ज्यासाठी तुम्हाला खूप ट्रोल केलं जातं, तरीही तुम्ही सुधारण्याचं नाव घेत नाही. दुसरीकडे, एका चाहत्याने तिला 'वर्ष २०२२ चे प्रेरक गाणं' म्हटलं आहे.