आता होणार खरा धमाका, रणबीर कपूरसोबत 'धूम 4' मध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री? मोडणार सर्व रेकॉर्ड

Dhoom 4 चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉलिवूडमधील या अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचा दावा केला जात आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 15, 2024, 01:25 PM IST
आता होणार खरा धमाका, रणबीर कपूरसोबत 'धूम 4' मध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री? मोडणार सर्व रेकॉर्ड

Dhoom 4 : यशराज फिल्मची सर्वात मोठी फ्रँचाइझी 'धूम' चित्रपटाचे तीन भाग आतापर्यंत रिलीज झाले आहेत. या चित्रपटाचे सर्व भाग बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरले होते. अशातच आता या चित्रपटाच्या चौथ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'धूम 4' मध्ये अभिनेता रणबीर कपूर आपली जादू दाखवताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात तो चोर बनून पोलिसांना अडचणीत आणणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आता या चित्रपटाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. 'धूम 4' चित्रपटामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचा दावा केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटामध्ये निर्माते रणबीर कपूरच्या जुन्या सहकलाकाराला आणत असल्याचे सांगितले जात आहे. 

'धूम 4' चित्रपटात या अभिनेत्रीची होणार एन्ट्री

'धूम 4' चित्रपटासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात रणबीर कपूरसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील दिसणार आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटात श्रद्धा कपूरची एन्ट्री झाली असून ती अभिनेता रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्यामुळे रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचे चाहते देखील प्रचंड खूश झाले आहेत. याआधी देखील दोघे 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात एकत्र दिसले होते. या दोघांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

दरम्यान, 'धूम 4' या चित्रपटात देखील दोघेही प्रेक्षकांना प्रभावित करतील असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु, काही चाहते या अहवालांवर अजिबात खूश नाहीत. कारण चाहत्यांना तृप्ती डिमरीला पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत बघायचे आहे. तर काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दीपिका पदुकोणला कास्ट करावे. 

'धूम 4' चित्रपटातून अभिषेक बच्चन गायब होणार? 

'धूम' चित्रपटाचा पहिला भाग 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून अभिषेक बच्चन या चित्रपटाशी जोडला गेला आहे. चित्रपटाच्या तिन्ही भागांमध्ये अभिषेक बच्चन एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आणि चोराला पकडताना दिसत आहे. पहिल्या भागात जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.

'धूम 2' मध्ये अभिषेक बच्चन आणि ह्रतिक रोशन यांची टक्कर झाली होती. तर तिसऱ्या भागात आमिर खान खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. मात्र, 'धूम 4' मध्ये अभिषेक बच्चन पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार नसल्याचा दावा केला जात आहे. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More