दिया मिर्झाने कोरोना काळात गर्भवती महिलांना दिली महत्त्वाची माहिती

अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 

Updated: May 17, 2021, 07:59 AM IST
दिया मिर्झाने कोरोना काळात गर्भवती महिलांना दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता देखील तिने एक महत्त्वाची माहिती  गर्भवती महिलांना दिली आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. या धोकादायक विषाणूवर मात करण्यासाठी सगळीकडे लसीकरण सुरू आहे. कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लस गर्भवती महिलांनी घ्यावी का? याची माहिती दियाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

दिया ट्विट करत म्हणाली, 'सध्या भारतात लसीकरण मोहिम सुरू आहे. पण गर्भवती महिलांना लस घेता येणार नाही. डॉक्टरांच्या माहितीनुसार ही लस गर्भवती महिलांना द्यावी की नाही यावर वैद्यकीय चाचणी झाली नाही.' दरम्यान काही दिवसांपूर्वी दिया मिर्झाने सोशल मीडियावर बेबी बम्पसह फोटो पोस्ट करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती.

पण तिच्या या पोस्टनंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. तेव्हा दियाने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देखील दिलं. सांगायचं झालं तर दियाचं हे दुसरं लग्न आहे. तिने काही महिन्यांपूर्वी उद्योगपती वैभव रेखीसोबत लग्न केलं. आता लवकरचं दिया तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.