पापाराझींना पाहताच दिया मिर्झाच्या सावत्र लेकीनं का लपवला चेहरा?

Dia Mirza Step Daughter : दिया मिर्झाच्या लेकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 18, 2023, 04:53 PM IST
पापाराझींना पाहताच दिया मिर्झाच्या सावत्र लेकीनं का लपवला चेहरा? title=
(Photo Credit : Social Media)

Dia Mirza Step Daughter : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. दिया मिर्झा ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचाविषयी ठरते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती प्रेक्षकांच्या संपर्कात राहते. दिया मिर्झाचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दियाची सावत्र मुलगी देखील दिसत आहे. कॅमेरा पाहताच कशा प्रकारे दिया मिर्झाची लेक तिचा चेहरा लपवते त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे. 

दिया मिर्झा आणि तिच्या सावत्र लेकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिया मिर्झा एक रेस्तराँच्या बाहेर असल्याचे पाहायला मिळते. यावेळी तिच्यासोबत तिची सावत्र लेक देखील दिसते. पापाराझींना पाहताच तिची सावत्र लेक म्हणजे समायरा रेखी घाबरते आणि त्यानंतर तिचा चेहरा लपवते. सुरुवातीला समायरा दियाच्या मागे तिचा चेहरा लपवते आणि त्यानंतर तिचे केस चेहऱ्यासमोर घेताना दिसते. व्हिडीओत दिया मिर्झा बोलताना दिसते की 'तिला घाबरवू नका, तिला फोटो काढायला आवडत नाही.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दियानं असं सांगताच पापाराझींनीं तिचं म्हणणं ऐकलं आणि त्यांनी फोटो काढणं बंद केलं. दियाची लेक जेव्हा गाडीत बसली त्यानंतर पापाराझींनी दियाचे फोटो क्लिक केले. कोण आहे समायरा? समायरा ही दिया मिर्झाचे पती वैभव रेखी यांच्या पहिल्या पत्नीची लेक आहे. दिया आणि वैभव यांना एक मुलगा असून अव्यान आजाद रेखी असं त्याचं नाव आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिया मिर्झानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये देखील तिच्या लेकीचा चेहरा लपवताना दिसते. तर दुसरीकडे तिचा मुलगा अव्यान हा कॅमेरा फ्रेंडली असल्याचे दिसते. अव्यानचे अनेक व्हिडीओ आणि फोटो दिया शेअर करते. त्याच्या फोटो आणि व्हिडीओजला प्रेक्षक पसंती देताना दिसतात. 

हेही वाचा : एक लाखाचं शर्ट ते हजार डान्सर्स...'गदर 2' च्या कलेक्शनपेक्षा जास्त आहे शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा बजेट!

दियाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर दिया मिर्झा ही त्या काळची नॅशनल क्रश झाली होती. या चित्रपटात दिया मिर्झानं अभिनेता आर माधवनसोबत स्क्रिन शेअर केली होती. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आजही या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.