'माझं पहिलं बाळ...', निधनाची बातमी कळताच दिया मिर्झाच्या भावनांचा आक्रोश

दिया मिर्झानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कमेंट करत अनेकांनी तिच्या दु:खात सामिल असल्याचं सांगितलं आहे.

Updated: Aug 4, 2022, 01:38 PM IST
'माझं पहिलं बाळ...', निधनाची बातमी कळताच दिया मिर्झाच्या भावनांचा आक्रोश

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. दियानं तिची भाची तान्या काकडे हिच्या निधन झालं आहे. दियानं ही धक्कादायक बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. तसेच आपलं दुःख व्यक्त केलं. दियाची ही पोस्ट पाहून कलाविश्वातील मंडळींनी यावर कमेंट केल्या आहेत.

दियानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही अधिकृत बातमी शेअर केली आहे. दियानं आपल्या भाचीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अगदी तरुण असल्याचं दिसून येत आहे. 'माझी भाची, माझं बाळ आणि माझं मुल आता या जगातच नाही. तू जिथे कुठे असशील तिथे तुला प्रेम आणि शांती मिळो. तू नेहमीच आम्हाला हसवलंस. तू जिथे असशील तिथे तुझं नाचणं, हसणं आणि गाण्यानं आनंद बहरेल. ओम शांती', असं म्हणत दियानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी दियाच्या पोस्टवर कमेंट केली आहे. यात अभिनेता सुनील शेट्टी, गौरव कपूर, ईशा गुप्ता, सिद्धांत चतुर्वेदी, रिद्धिमा कपूर साहनी हे कलाकार आहेत. यापोस्ट व्यतिरिक्त तान्यानं सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दियानं तान्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी फोटो शेअर करत तान्या मुंबईत आल्यावर किती मज्जा करायची आणि तिच्या आठवणी शेअर केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दियाच्या भाचीचं निधन नक्की कशामुळे झालं याबाबत तिने बोलणं टाळलं आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, कार अपघातामध्ये तान्याचं निधन झालं. हैद्राबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल विमानतळावरून तान्या आपल्या मित्र-मंडळींबरोबर घरी परतताना हा अपघात घडला. तिला लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तान्याने अखेरचा श्वास घेतला.