Bollywood Drugs Case : दिया मिर्जाच्या एक्स मॅनेजरला अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे.  

Updated: Jan 10, 2021, 09:09 PM IST
Bollywood Drugs Case : दिया मिर्जाच्या एक्स मॅनेजरला अटक

मुंबई :  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आतापर्यंत अनेक जणांचे जबाब नोंदवले आहेत. ड्रग्स बाळगल्या प्रकरणी अनेकांना अटक देखील करण्यात आली. आता ड्रग्स प्रकरणी एनसीबीने दिया मिर्जाच्या एक्स मॅनेजरला अटक केली आहे. दियाचा एक्स मॅनेजर रहिला फर्नीचरवालासह (Rahila Furniturewala) त्याची बहिण आणि इतर दोघांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे.

त्याचप्रमाणे एनसीबीने एका ब्रिटीश व्यवसायिकालाही ड्रग्स प्रकरणी अटक केली आहे. वांद्रे वेस्टमध्ये एका कुरियरमधून गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती डीएनएने दिली आहे. शिवाय  रहिला फर्नीचरवाला आणि त्याच्या बहिणीकडून 200 किलोग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. 

दरम्यान 14 जून रोजी अभिनेता सुशांतने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी सुरू झाल्यानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स ऍगल समोर आलं. त्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण, रकुल प्रीत, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि अभिनेता अर्जुन रामपालची देखील चौकशी करण्यात आली. 

शिवाय  कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली होती. अद्यापही ड्रग्स प्रकरणी एनसीबीची चौकशी सुरू आहे.