वरूण धवन चढणार बोहल्यावर? दिलं स्पष्टीकरण

काय म्हणाला वरूण

Updated: Jan 10, 2021, 03:27 PM IST
वरूण धवन चढणार बोहल्यावर? दिलं स्पष्टीकरण

मुंबई : अभिनेता वरून धवण आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. नताशा आणि वरूण यांची लहानपणापासून असणारी मैत्री लवकरच नवीन वळण घेणार आहे. वरूण-नताशाच्या लग्नाच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. यंदाच्या वर्षी वरूण बोहल्यावर चढेल का? असा प्रश्न सतत वरूणला चाहत्यांकडून विचारला जात आहे. अशात खुद्द वरूणने या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्टीकरण दिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

नुकताच वरूणने नताशासोबत लग्नाच्या योजनांविषयी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला 'प्रत्येक जण गेल्या वर्षीपासून मला माझ्या लग्नाविषयी विचारत आहे. अद्याप  लग्नाचं काही ठरलं नाही.' शिवाय कोरोनामुळे लग्नास विलंब झाला असल्याचं देखील त्याने सांगितलं. 

दरम्यान, अभिनेत्री करीना कपूर खानच्या 'व्हॅट वुमन व्हॉट' शोमध्ये नताशा आणि वरूण उपस्थितीत होते. तेव्हा देखील करीनाने त्यांच्या लग्नाविषयी विचारले होते. तेव्हा देखील वरूण लग्नाविषयी अद्याप काहीही ठरलं नसल्याचं सांगितलं.