'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा ऑडिशन व्हिडीओ Viral; ती हे काय करतेय?

या व्हिडीओमध्ये नोराला ओळखणंही कठीण...   

Updated: Aug 5, 2021, 06:03 PM IST
'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा ऑडिशन व्हिडीओ Viral; ती हे काय करतेय?
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

Nora Fatehi Audition Video: नोरा फतेही (nora fatehi ) हिच्या अदांनी आजवर चाहते कायमच घायाळ होत आले आहेत. कमनीय बांधा, मादक अदा आणि तितकंच प्रभावी नृत्यकौशल्य याची सुरेख सांगड नोरामध्ये पाहायला मिळते. नोराचा हा अंदाज पाहता सेलिब्रिटी वर्तुळामध्ये तिला मिळालेलं स्थान आणि लोकप्रियता याबाबत धक्का बसण्याचं काहीच कारण नाही. 

अजय देवनगनपासून सलमान खानपर्यंत स्क्रीन शेअर करणाऱ्या नोरानं मिळवलेली ही प्रसिद्धी आणि यश इतक्या सहजासहजी तिच्या वाट्याला आलं नव्हतं. इतर कलाकारांप्रमाणंच तिलाही संघर्ष करावाच लागला होता. अनेकदा तर, तिला कामासाठी नकारही पचवावा लागला होता. 

बऱ्याच ठिकाणी नोरानं ऑडिशन्सही दिल्या होत्या. सध्या तिच्या अशाच एका ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये नोराला ओळखणंही कठीण होत आहे. कारण, सध्याची नोरा आणि तेव्हाची नोरा यामध्ये बराच फरक स्पष्टपणे कळून येत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार नोरा त्यावेळी अवघ्या 20 वर्षांची होती. त्यावेळी तिचा लूकही वेगळा होता. अंगकाठी बारीक होती. ऑडिशनसाठी तिला काही दृश्य सांगण्यात आली होती, ज्यावर तिनं अभिनय करणं अपेक्षित होतं आणि तिनं तसं केलंही. नोराचा हा ऑडिशन व्हिडीओ तिच्यासाठीसुद्धा गतकाळातील दिवसांना उजाळा देणारा एक आठवणींचा खजिना ठरत असणार यात शंका नाही.