मुंबई : जर कुठल्या अभिनेत्रीने एखाद्या रात्रभरात स्टारडम मिळवलं असेल तर ती डिंपल कपाडिया आहे. तिच्या पहिल्याच चित्रपटापासून तिने चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवलं आणि अनेक पुरस्कारही जिंकले. डिंपल कपाडिया यांचे वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार. ती नेहमीच तिचं लग्न आणि अफेअर्समुळे चर्चेत असते. अगदी लहान वयातच तिने 12 वर्षाने मोठ्या बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारसोबत लग्न केलं, मात्र त्यांचं हे नात जास्त दिवस टिकू शकलं नाही.
वयाच्या 16व्या वर्षी पहिला चित्रपट प्रदर्शित झाला
बॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राज कपूर यांनी डिंपल कपाडियाला बॉलिवूडमध्ये एंट्री दिली. डिंपल कपाडिया तेव्हा फक्त 16 वर्षांची होती. त्यांचा पहिला चित्रपट बॉबी 1973मध्ये अभिनेता रिषी कपूर यांच्यासह पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं तरुणांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण केली. हा चित्रपट बॉक्सऑफसवर सुपरहिट ठरला.
राजेश खन्ना यांच्या प्रेमात बुडाली
लहान वयातच सिने दुनियेत प्रवेश करणारी डिंपल कपाडिया बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्नाच्या प्रेमात बुडाली. डिंपलपेक्षा राजेश खन्ना 12 वर्षांनी मोठे होते. डिंपल आणि राजेश यांची पहिली भेट अहमदाबादमधील क्रीडा संकुलात झाली. एका कार्यक्रमादरम्यान दोघांची भेट झाली आणि दोघेही प्रेमात बुडाले.
लग्नानंतर टिकलं नाही नातं, सोडलं बॉलिवूड
डिंपलने 1973मध्ये राजेश खन्नाबरोबर पहिल्याच चित्रपटाच्या वेळी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर डिंपलनं चित्रपटात काम करु नये अशी राजेश खन्ना यांची इच्छा होती. एका रिपोर्टनुसार डिंपलने पुढच्या काही वर्षांत बॉलिवूड सोडलं. परंतु असं असूनही, त्यांच्या नात्यात पेच निर्माण झाला जो कधीही भरु शकत नाही. लग्नाच्या दहा वर्षानंतर 1982मध्ये दोघं विभक्त झाले. मात्र या दोघांनी कधीच घटस्फोट घेतला नाही
सनी देओलसोबत अफेअर
डिंपल राजेश खन्नासोबत विभक्त झाल्यानंतर बॉलिवुडमध्ये पुन्हा एकदा एंन्ट्री घेतली. आणि त्यानंतर एकामागून एक हिट सिनेमा दिले आणि त्याचवेळी डिंपलची आणि सनी देओलची जोडी बॉक्सऑफिसवर खूप हिट ठरली. या दोघांना सिनेमांत सोबत घेण्याकरिता नर्मात्यांची लाईन लागली. राजेश खन्नापासून विभक्त झाल्यानंतर डिंपल सनी देओलशी जवळिकता वाढली. दोघांनाही बर्याचदा एकत्र स्पॉट केलं गेलं. डिंपलला सनीशी लग्न करायचं होतं पण, आधीच लग्न झालेल्या सनी देओलला आपल्या पत्नीशी कधीच घटस्फोट घ्यायचा नव्हता. डिंपल आणि राजेश खन्ना यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकू खन्ना या दोन मुली आहेत.