हनुमानजी बहिरे होते का; ओम राऊतचे 'ते' जुनं ट्विट व्हायरल

Om Raut Old Tweet: सध्या दिग्दर्शक ओम राऊत यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे ओम राऊत यांचे एक जूने ट्विट आहे. 'आदिपुरूष' या चित्रपटाला सध्या सगळीकडूनच ट्रोल करण्यात आलं आहे. त्यापार्श्वभुमीवर सध्या त्याचे हे जुने ट्विट फारच चर्चेत आलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 18, 2023, 08:15 PM IST
हनुमानजी बहिरे होते का; ओम राऊतचे 'ते' जुनं ट्विट व्हायरल   title=
June 18, 2023 | director om raut old tweet gets viral on hanuman after adipurush bad reviews on social media

Om Raut Old Tweet: 'आदिपुरूष' या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाला सध्या सगळीकडूनच ट्रोल करण्यात येते आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रामायणाची खिल्ली उडवल्याचे अनेक लोकांनी म्हटले आहे. त्यातून आता आता या चित्रपटातून संवाद आणि व्हीएफएक्सवरून या चित्रपटावर सपाटून टीका केली आहे. रावणाची लंका सोन्याचा नाही तर कोळश्याची आहे. त्यातून रावणाची वेशभुषा, त्याचे संवाद त्याचसोबत इंद्रजितची वेशभुषा आणि हनुमानाच्या तोंडातून निघणारे संवाद यांमुळे या चित्रपटावरचा राग अधिकच वाढत गेला आहे. सध्या या चित्रपटातील या दृश्यांमुळे जनमानसात रोष निर्माण झाला आहे. त्यातून आता या सगळ्यात चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांचे एक जूने ट्विट व्हायरल झाले आहेत. 

त्यांचे हे ट्विट 4 एप्रिल 2015 आहे. त्याचवर्षी ओम राऊत यांचा 'लोकमान्य' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. हनुमान जयंतीनिमित्तानं वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवरून, डीजेवरून त्यांनी हे ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, ''हनुमानजी बहिरे आहेत का? माझ्या बिल्डिंगमधील लोकांना कदाचित हेच वाटतंय. हनुमान जयंतीनिमित्त हे लोकं मोठमोठ्या आवाजात गाणी लावत आहेत, वाजवत आहेत. इतकंच नाही तर जयंतीशी या गाण्याचा काहीच संबंध नाही''

हे ट्विट आता पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. त्यातून आता नेटकऱ्यांनी यावर नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता याचा सुड आदिपुरूषसारखा चित्रपट बनवून घेणार का, असा सवाल अनेकांनी घेतला आहे. एका युझरनं त्यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट घेतला आहे आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे आणि त्याखाली नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे सध्या या चित्रपटाची चांगलीच नेगेटिव्ह पब्लिसिटी होते आहे आणि ओम राऊत यांनी याची चांगलीच टीका सहन करावी लागत असून त्यांच्या मागील शुक्लकाष्ट काही कमी व्हायचं नावंच घेत नाहीये. 

हनुमानाच्या डायलॉगवरून आक्षेप

सध्या या चित्रपटातील अनेक संवादावरून आणि दृश्यांवरून टीका होते आहे. त्यातून या चित्रपटातील हनुमानाच्या संवादांवर आक्षेप घेण्यात आला आहे. एका दृश्याच्या वेळी हुनमान म्हणतात की, 'कपडा तेरे बाप का, आग तेरे बाप की, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरी बाप की' असा डायलॉग आहे ज्यावर सगळ्यांनीच आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या चित्रपटावर चांगला रोष निघाला आहे.