मुंबई : दाक्षिणात्य दिग्दर्शक एस. एस. राजमौली (S. S. Rajamouli) हे लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. प्रत्येक कलाकाराला त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. प्रेक्षकांना जर कळलं की एस.एस. राजमौली यांचा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे तर ते देखील आतुरतेनं प्रतिक्षा करतात. सध्या ट्विटरवर एस. एस. राजमौली ट्रेंड होत आहेत. त्याचं कारण एस.एस. राजमौली यांचा आगामी चित्रपट नाही तर ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.
एस.एस. राजमौली हे सोशल मीडियावर ट्रेंड होण्याचं कारण त्यांना ओळख मिळालेला चित्रपट म्हणजेच बाहुबली: द बिगनिंग (Baahubali). या चित्रपटानं त्यांना ओळख दिली. त्यानंतर त्यांनी लगेच त्याचा दुसरा पार्ट बाहुबली: द कन्क्लुजन (Baahubali 2) बनवला. या दोन्ही चित्रपटांची क्रेझ प्रेक्षकांना अजूनही आहे. दरम्यान, या दोन्ही चित्रपटांमध्ये एस.एस. राजमौली यांनी हॉलिवूडच्या चित्रपटांना कॉपी केल्याचं म्हटलं जात आहे.
SS Rajamouli pic.twitter.com/9KQQfRaGJh
— Shantanu (@shaandelhite) September 1, 2022
The research you have done is more appreciative than the creativity of @ssrajamouli Hats off whoever has done this video https://t.co/NuD73v5Txx
— Solitaire (@Bilacksmith) September 2, 2022
ट्विटरवर एक ट्वीट सध्या व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये नेटकऱ्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राजमौलींवर हॉलिवूडच्या चित्रपटातून सीन्स कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडीओत बाहुबली आणि बाहुबली चित्रपटातील काही सीन्स दाखवण्यात आले आहेत.
आणखी वाचा : पंकज त्रिपाठींनी 5 स्टार हॉटेलमधून चप्पल चोरली? विश्वास बसणार नाही, पण हे खरंय
Arrey ! Ekdum same to same! https://t.co/AsDRYPMu0V
— Shivaani Dhar Sen (@mcshivanisen) September 2, 2022
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, तू ज्या प्रकारे रीसर्च केली आहे एस.एस. राजमौलीच्या क्रीएटिव्हिटीपेक्षा तू ज्या प्रकारे रीसर्च करून हा व्हिडीओ ज्या व्यक्तीनं बनवला आहे ते अधिक कौतुकास्पद आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, 'अरे देवा हे तर जसंच्या तसं आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला,' एस.एस.राजमौली कॉपी करू शकतात असं वाटलं नव्हतं.'