मुंबई : नवसाला पावणारा म्हणून अंधेरीचा राज ओळखला जातो. यंदाच्या वर्षी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भारतीय अमेरिकन गायिका आणि गीतकार लिसा मिश्रा आली होती. यावेळी लिसानं मिनी ड्रेस परिधान केला होता. दर्शन घेण्यासाठी मिनी ड्रेसमध्ये आलेल्या लिसाला तिथल्या मंडळानं पाहिलं आणि त्यांनी लगेच तिला शाल दिली. त्यानंतर लिसाला अंधेरीच्या राजाचे दर्शन घ्यायला मिळाले त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणावरुन आता एक नवा वाद सुरु झाला आहे यावेळी भक्ती की कपडे काय महत्त्वाचं आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
अंधेरी राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांनी पूर्ण शरीर झाकतील असे कपडे परिधान करावेत असा नियमच मंडळाने, गेल्या 12 वर्षांपासून केला असल्याचं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, लिसानं मिनी ड्रेस परिधान केल्याचे पाहिल्यानंतर मंडळानं तिला शाल दिली. त्यानंतरच तिला दर्शनासाठी पुढे पाढवल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. नंतर लिसानं उंदीर मामाच्या कानात तिनं तिच्या मनातील इच्छा सांगितली.
एका वृत्तवाहिणीनं दिलेल्या माहितीनुसार, भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपण समाजात वावरत असताना कपड्याचे भान ठेवायला हवं. शिवाय सर्वांना कोणतेही कपडे परिधान करायचा अधिकार आहे. मात्र, मंडळाचा नियम असेल तर तो पाळायला हवा. या सर्व प्रकरणामुळे आता भक्ती महत्वाची की कपडे महत्वाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोण आहे लिसा मिश्रा?
लिसानं 2018 मध्ये प्रदरेशित झालेल्या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटातील 'तारीफा' गाण्याच्या रिप्राइझ व्हर्जनमुळे ओळखली जाते. त्यानंतर लिसानं 2019 च्या जजमेंटल है क्या चित्रपटातील 'द वखरा', 'द स्काय इज पिंक' या चित्रपटातील 'नादानियां' आणि गुड न्यूज मधील 'चंदीगड में पार्टी' सारखी अनेक गाणी गायली आहेत.