ते रंग लावयला आले आणि अभिनेत्री पळत सुटली... व्हिडिओ व्हायरल

तिचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

Updated: Mar 15, 2022, 06:39 PM IST
 ते रंग लावयला आले आणि अभिनेत्री पळत सुटली... व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : टीव्ही आणि बॉलिवूड स्टार्स होळीचा सण साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र यादरम्यान अभिनेत्री दिशा परमार होळी खेळण्यास आणि रंग उडवण्यास मनाई करताना दिसत आहे.

तिचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, अभिनेत्री जेव्हा कॅमेऱ्यासमोर पोज द्यायला येते तेव्हा तिला वाटते की कोणीतरी तिला रंग लावणार आहे.

अशावेळी ती जोरात ओरडताना दिसत आहे, या व्हिडिओमध्ये दिशा परमार तिच्या चाहत्यांना रंग लावण्यास नकार देताना दिसत आहे. आणि पापाराझींना पोज देऊन जाताना ती होळीच्या शुभेच्छा देतानाही दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा खास संदेश दिल्यानंतर आणि मीडियाशी गप्पा मारल्यानंतर दिशा गाडी बसून निघून गेली. यादरम्यान, अभिनेत्रीचा नो मेकअप लूक दिसून आला दिसते. तिने डेनिम जॅकेट आणि काळी जीन्स परिधान केली होती.