ट्रान्सपरंट टॉप घालून एअरपोर्टवर पोहचली दिशा पाटनी, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते.

Updated: Mar 7, 2022, 06:23 PM IST
ट्रान्सपरंट टॉप घालून एअरपोर्टवर पोहचली दिशा पाटनी, व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या प्रत्येक लूकला चाहते भरपूर पसंती देतात. दिशाचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये आपल्या लूक्समुळे दिशाने फँन्सला वेड लावलं आहे. व्हाईट ट्रान्सपरंट टॉपमध्ये दिशा खूप हॉट दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 अभिनेत्रीने परिधान केला ट्रान्सपरंट टॉप 
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, मुंबई एअरपोर्टवर दिशा पाटनी व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. तिने व्हाईट कलरचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. ज्या टॉपला तिने जॉगर्ससोबत पेअर केलं आहे. यासोबतच दिशाने कंबरेला आपलं जॅकेट बांधल्याचं दिसत आहे. याचबरोबर तिने मॅचिंग कलरचे स्निकर्स परिधान केले आहेत. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाईक्स कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

बिकीनीमध्ये फ्लॉन्ट केली होती फिगर
दिशाने इंस्टाग्राम अकांऊन्टवर आपले दोन फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती बिकीनीमध्ये दिसली होती. तिने मिररसमोर आपल्या परफेक्ट फिगरला फ्लॉन्ट केलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशा पाटनीचे सिनेमा
दिशाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर दिशा पटानी शेवट 'राधे' या चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये तिने सलमान खानसोबत काम केलं होतं. मात्र, या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. सध्या दिशा पटानी तिच्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये ती अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. याशिवाय दिशाकडे 'योधा' सिनेमा देखील आहे ज्यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.