ज्या धरणामुळे पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड झाला कमी त्यापेक्षा शक्तीशाली धरण बांधणार चीन; भारताला मोठा धोका

China Three Gorges Dam :  चीन मधील थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. मात्र, चीन आता या धरणापेक्षा मोठे धरण बांधणार आहे. हे धरण भारतासाठी धोकादायक ठरणार आहे.  

वनिता कांबळे | Updated: Dec 26, 2024, 08:29 PM IST
ज्या धरणामुळे पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड झाला कमी त्यापेक्षा शक्तीशाली धरण बांधणार चीन; भारताला मोठा धोका   title=

China Brahmaputra River Tibet Dam:  जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. थ्री गॉर्जेस डॅम (Three Gorges Dam) असे या धरणाचे नाव आहे. हे धरणाची शक्ती इतकी आहे की यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड  कमी झाला आहे. मात्र, आता चीनने यापेक्षा मोठी आणि यापेक्षा शक्तीशाली धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे.  ब्रह्मपुत्रा नदीवर बांधल्या जाणाऱ्या या धरणाचा सर्वाधिक धोका भारताला होणार आहे. चीन या धरणाचा वापर भारताविरोधात धोरणात्मक शस्त्र म्हणून करणार आहे. 

चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने जिनपिंगने सोशल मिडियाद्वारे या धरण प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली आहे.  भारताच्या सीमेजवळील ब्रह्मपुत्रा नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे. चीनने या धरण प्रकल्पाचे वर्णन 'पृथ्वीवरील सर्वात मोठा प्रकल्प' असे केले आहे. जगातील हे सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी चीन 137 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. हे धरण तिबेटमध्ये भारतीय सीमेजवळ बांधले जाणार आहे.  ज्यामुळे भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांसाठी हे धरण धोकादायक ठरु शकते. हे धरण हिमालयाच्या त्या भागात बांधले जाणार आहे जिथून ब्रह्मपुत्रा नदी मोठा यू-टर्न घेते आणि अरुणाचल प्रदेशात येते आणि नंतर बांगलादेशकडे जाते. 

सुमारे 2900 किमी लांबीची ब्रह्मपुत्रा नदी भारतात येण्यापूर्वी तिबेटच्या पठारावरून वाहते. ही नदी तिबेटमध्ये पृथ्वीवरील सर्वात खोल खंदक बनते. तिबेटी बौद्ध भिक्षू याला अतिशय पवित्र मानतात. भारताच्या सीमेजवळील मुसळधार पावसाच्या भागात चीन हे धरण बांधणार आहे.  हे धरण दरवर्षी 300 अब्ज किलोवॅट वीज निर्मीती करेल. सध्या, चायनाचे थ्री जॉर्जेस डॅम हे वीज निर्मितीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठे धरण आहे. येथे दरवर्षी 88.2 अब्ज किलोवॅट वीज निर्मिती होते. नव्याने बांधले जाणारे हे धरण थ्री गॉर्जेस डॅमच्या 3 पट वीज निर्मीती करणार आहे. 

हे देखील वाचा... जगातील सर्वात मोठं धरण ज्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड झाला कमी; उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकमेकांपासून गेले दूर

थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वात मोठे धरण आहे.  चीनच्या हुबेई प्रांतात असलेले थ्री जॉर्जेस धरण यांग्त्झी नदीवर बांधले आहे. या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग थोडा कमी झाला आहे.  एका दिवसाचा वेळ सुमारे  0.06  मायक्रोसेकंदांनी वाढला आहे.  

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x