दिशाची बहिण तिच्यापेक्षाही बोल्ड, व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल...

दिशाच्या बहिणीने टेबलवर चढून जे काही केलं ते पाहून...  

Updated: Nov 29, 2021, 01:07 PM IST
दिशाची बहिण तिच्यापेक्षाही बोल्ड, व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल...

मुंबई : अभिनेत्री दिशा पटानी सौंदर्याच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही पण तिची बहीण खुशबू पटानीही प्रसिद्ध अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत मागे टाकते. अलीकडेच खुशबू असे काही करताना दिसली की, तिच्या बहिणीला म्हणजेच दिशाला देखील तसं करायचं होतं. दिशा म्हणाली, 'मला देखील असं काही करता आलं असतं तर...' दिशा पटानी सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते.

आता देखील दिशाने बहीण खुशबू पटानीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये खुशबूजगाची पर्वा न करता बिनधास नाचताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिशा बहिणीला  वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली.  'मला तुझ्यासारखा डान्स करता आला असता तर...' त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी भारतीय सैन्यात लेफ्टनंट आहे. एवढंच नाही तर दिशाची खूप खास मैत्रीण आहे. खुशबू पटानीचे अधिकृत इंस्टाग्राम पेज आहे ज्यामध्ये ती तिचे फोटो आणि वर्कआउट व्हिडीओ शेअर करते.