'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये होणार 'दया बेन'ची एन्ट्री

'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या चाहत्यांसाठी खुशखबर

Updated: May 10, 2019, 01:29 PM IST
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये होणार 'दया बेन'ची एन्ट्री

मुंबई : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कॉमेडी मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेपासून दूर असलेली 'दया बेन' अर्थात दिशा वकानी पुन्हा मालिकेत येणार असल्याची चर्चा आहे. दिशा वकानीने मालिकेत पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. येत्या १८ मे रोजी दिशा वकानी 'तारक मेहता...'च्या सेटवर येण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही मात्र 'दया बेन' पुन्हा येण्याच्या चर्चेने चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Image result for disha vakani zee

'मिड डे'ने दिलेल्या वृत्तानुसार, दिशा वकानी मालिकेत शूटिंगसाठी पुन्हा येण्यास तयार झाली असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच दिशाने प्रोडक्शन हाऊस नीला टेली फिल्म्समधील व्यक्तीशी संपर्क केला होता. यावेळी चर्चांमधून दिशा मालिकेतून बाहेर पडल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, दिशा वकानी मालिकेचे निर्माते असित कुमार यांच्या इटलीहून परत येण्याच्या प्रतिक्षेत आहे. असित कुमार कुटुंबासह इटलीमध्ये सुट्टीवर आहेत. मिळालेल्या रिपोर्टनुसार, दिशा वकानी १८ मे पासून शूटिंग सुरु करण्याची शक्यता आहे. दिशाने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर दिशाला अनेक चाहत्यांनी पुन्हा मालिकेत येण्याचा आग्रह केला आहे. त्यामुळे आता दिशा पुन्हा मालिकेत येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

 
 
 
 

A post shared by Disha Vakani (@disha.vakani) on

दिशा वकानी सप्टेंबर २०१७ पासून 'तारक मेहता...' मालिकेपासून लांब आहे. ती प्रसूती रजेवर होती. परंतु दिशा वकानीचे पती आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये दिशाच्या शूटिंगच्या वेळा आणि मानधनामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र आता दिशा पुन्हा येणाच्या चर्चांनी 'दया बेन'ची मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.