मुंबई : सेलिब्रिटी कलाकारांच्या वैयक्तिक आयु्ष्याबद्दल जाणून घेण्यात चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या रोजच्या लाईफस्टाईलला अनेकजण फॉलो करतात.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिर खानने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचे बहुतेक चित्रपट हिट ठरले. अभिनेत्याला चित्रपट बनवण्यासाठी खूप वेळ लागतो पण त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करतो.
आमिर खानचे चित्रपट भरपूर कमाई करतात. कमाईच्या बाबतीत आमिर खान अनेक अभिनेत्यांच्या रांगेत पुढे आहे.
आमिरला गाड्यांचीही खूप आवड आहे. त्यांच्या संपत्तीबद्दल देखील बऱ्याचदा चर्चा होताना दिसते. सोबतच त्याचा कार कलेक्शन देखील सगळ्यांच लक्षवेधून घेणारं ठरतं.
आमिर खानकडे आज करोडोंची संपत्ती आहे. एका रिपोर्टनुसार आमिर खानकडे 1562 कोटींची संपत्ती असल्याचं समोर येत आहे.
आमिरची एका महिन्याची कमाई 10 कोटींहून अधिक आहे. आमिर खान वार्षिक 120 कोटी रुपये कमावतो. गेल्या अनेक वर्षांत आमिर खानची संपत्ती खूप वाढली आहे.
चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच आमिर जाहिरात, चित्रपट निर्मिती आणि स्टेज परफॉर्मन्समधून मोठी कमाई करतो.
एका जाहिरातीसाठी तो करोडो रुपये घेतो. अनेक वेळा आमिर ज्या चित्रपटात काम करतो तोही स्वत:चं प्रोड्युस करतो.
आमिर खानला लक्झरी गाड्यांची आवड आहे. त्याच्याकडे गाड्यांचं मोठं कलेक्शन आहे.
या वाहनांच्या यादीमध्ये Rolls-Rodge, Ford, Mercedes-Benz, Bentley Continental Flyme Spur, BMW 6 Series आणि Range Rover यांचा समावेश असल्याचं बोललं जातं.