मुंबई : सूरज बड़जात्या दिग्दर्शित 'मैने प्यार किया' या चित्रपटामधून सलमान खानने चित्रपटसृष्टीत एंट्री घेतली. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही, मात्र यातली गाणी सुपरहिट झाली. या सिनेमातली सगळी गाणी प्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी गायली होती आणि संगीत प्रख्यात संगीतकार रामलक्ष्मण यांनी दिलं होतं. रामलक्ष्मण यांनी नुकताच या जगाला निरोप दिला. शनिवारी नागपुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज आम्ही तुम्हाला 'मैंने प्यार किया' या चित्रपटाशी संबंधित किस्स्यांबद्दल सांगणार आहोत जो किस्सा आजही सलमानच्या चाहत्यांना आठवतो. मग हा किस्सा चित्रपटात भाग्यश्रीसोबत सलमान खानचा असलेला किसिंग सीन असो वा झीनत अमानची चित्रपटावर दिलेली प्रतिक्रिया असो.
भाग्यश्रीने दिला होता किसींग सीनला नाकार
एक गोष्ट आपण नेहमी ऐकलीच असेल की, सलमान खान कधीच मोठ्या पडद्यावर किसींग सीन देत नाही. जेव्हा कोणत्या सीनची चर्चा होते तेव्हा 'मैंने प्यार किया' चित्रपटाचा उल्लेखही केला जातो. या चित्रपटामध्ये सलमान आणि भाग्यश्री यांच्यात किसींग सीन दाखवला गेला आहे.
मात्र हा सीन काचेच्या मदतीने शूट केला गेला आहे. या सीनबद्दल बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, सलमान खानने भाग्यश्रीला चित्रपटात किस कराय़ला नकार दिला होता . मात्र, हे खोटं आहे
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमान खानने या चित्रपटा संबंधित काही आठवणी शेअर केल्या. यावेळी त्याने सांगितलं होतं की, भाग्यश्रीने किसिंग सीन करण्यास नकार दिला होता. सलमान खान म्हणाला की, ''मला माहित होतं सिनेमात किसिंग सीन असणार आहे.
यावर मी दिग्दर्शकांना म्हणालो देखील, मला हे कसं जमेल. कारण मी या सीनबद्दल कर्म्फटेबल नाही आहे. मग सूरज जी म्हणाले की, ईथे तु कर्म्फटेबल नाहीस आणि तिथे तर भाग्यश्रीने हा सीनच करण्यास नकार दिला आहे''.
सलमान पुढे म्हणाला की, ''मला दिग्दर्शकांनी सांगितलं की, ''तुम्हाला स्मूच करायचं नाही आहे, हलकिशी किस करायची आहे. हा एक राजश्री चित्रपट आहे, त्यामुळे आम्ही देखील यांत जास्त डिप सीन टाकू शकत नाही. हे ऐकल्यावर मी हा सीन शूट करायला होकार दिला.
मात्र भाग्यश्रीने या सीनसाठी पुन्हा नकार दिला. सूरज आम्हा दोघांनी समजवून कंटाळला होते. तो अस्वस्थ झाला. शेवटी त्याने ठरवलं की, हा सीन काचेच्या सहाय्याने शूट करयाचा. मग काय हा सीन काचेच्या सहाय्याने शूट केला गेला''.
माझी पत्नी छोटे ड्रेस घालणार नाही…
यानंतर, सलमानने भाग्यश्रीचा नवरा हिमालयचा तो किस्सा शेअर केला, जेव्हा हिमालयने भाग्यश्रीला शॉर्ट ड्रेस घालायला नकार दिला. सलमानने सांगितलं की, हा किसींग सीन शूट झाल्या नंतर एक सीन शूट करायचा होता. ज्यात भाग्यश्रीला एक छोटा ड्रेस घालायचा होता.
भाग्यश्रीला यात काहीच अडचण नव्हती, पण त्यावेळी तिचं लग्न ठरलं होतं. त्यावेळी तिचा नवरा हिमालय या सिनेमाच्या सेटवर होता. त्यावेळी तिच्या नवऱ्याने भाग्यश्री कोणताही लहान ड्रेस घालणार नाही असं सांगितलं. यानंतर कसाबसा हा सीन पुन्हा शूट करण्यात आला.