Guess Who: एकेकाळी बॉडी शेमिंगमुळे अभिनेत्रीला हिणवलं; फोटोत दिसणाऱ्या चिमुरडीला ओळखलंत का?

Huma Qureshi Childhood Photo: अनेकदा बॉलिवूड स्टार्सचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका बॉलिवूड हस्तीचा लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तुम्ही ओळखलंत का कोण आहे ही अभिनेत्री? 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 3, 2023, 06:46 PM IST
Guess Who: एकेकाळी बॉडी शेमिंगमुळे अभिनेत्रीला हिणवलं; फोटोत दिसणाऱ्या चिमुरडीला ओळखलंत का?  title=
(Photo : Huma Qureshi | Instagram)

Huma Qureshi Childhood Photo: सेलिब्रेटींची चाईल्डहूड फोटोज म्हणजेच लहानपणीचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. अनेकदा त्यांच्या या फोटोंची चांगलची चर्चा रंगलेली दिसते. अनेकदा या फोटोंमधल्या बॉलिवूड सेलिब्रेटींना ओळखणंही कठीण होऊन जाते. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये एक छोटीशी लहान मुलगी आपल्या आईच्या कडेवर बसली आहे आणि ती खुदकन हसताना दिसते आहे. तिचा हा क्यूट फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. तुम्हाला कदाचित ओळखूनही येणार नाही की या फोटोतील ही मुलगी नक्की आहे तरी कोण? ही मुलगी प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे बिकीनीतले फोटो काही दिवसांपुर्वी व्हायरल झाले होते. 

तुम्हाला अजूनही लक्षात आलं नसेल की ही अभिनेत्री कोण आहे तर आम्ही तुम्हाला सांगतो की या अभिनेत्रीचं नावं काय, फोटोत आपल्या आईसोबत दिसणाऱ्या अभिनेत्रीचं नावं आहे हुमा कुरेशी. काही वर्षांपुर्वी आलेल्या 'गॅग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातून हुमानं नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गर्लफ्रेंडची भुमिका निभावली होती. त्यानंतर ती माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit) 'देढ इश्यिका' या चित्रपटातूनही काम केले आहे. यात तिनं माधुरीसोबत डान्सही केला होता. त्यानंतर हुमानं ओटीटीवरही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. ती तिच्या आगळ्यावेगळ्या भुमिकेसाठी लोकप्रिय आहे. 

हेही वाचा - प्रिया बापटनंतर सई ताम्हणकरचा लेस्बियन सीन; नव्या सिरिजचा ट्रेलर प्रदर्शित

हुमा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिचीही बरीच चर्चा रंगलेली असते. काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या सोनाक्षी सिन्हासोबतच्या 'डबल एक्स एल' या चित्रपटातून तिनं भुमिका केली होती. हा चित्रपट प्लस साईजवर आधारित होता. हुमाला आपल्या वजनामुळेही अनेकदा लोकांचे टोमणे ऐकावे लागले आहेत. सोबतच तिला बोडी शेमिंगलाही (Body Shaming) सामोरे जावे लागले होते. परंतु यावर मात करत तिनं आज आपल्या बोल्ड आणि ब्युटिफूल अदाकारीनं तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मदर्स डेच्या निमित्तानं हुमानं हा फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोखाली नानाविध कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे हा फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. हुमाचे काही दिवसांपुर्वी बिकीनीतले फोटो व्हायरल झाले होते. यावेळी हुमा एका वेगळ्याच अंदाजामध्ये दिसत होती. तिनं प्रिंडेट ब्लू कलरची बिकीनी घातली होती.