उर्फीबद्दल असं काय म्हणाली राखी सावंत ज्यामुळे 'ते' रहस्य... 'हा' video एकदा पाहाच!

त्या दोघीही सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. 

Updated: Aug 31, 2022, 02:36 PM IST
उर्फीबद्दल असं काय म्हणाली राखी सावंत ज्यामुळे 'ते' रहस्य... 'हा' video एकदा पाहाच!  title=

Urfi Javed and Rakhi Sawant: अभिनेत्री आणि कॉमेडी क्विन राखी सावंत आणि आपल्या विक्षिप्त फॅशनमुळे ट्रेलर्सच्या सतत निशाण्यावर असलेली सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद यांची मैत्री किती घट्ट आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्या दोघीही सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. 

कॉन्ट्रोव्हर्सी क्विन राखी सावंत तर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच मीडियामध्ये चर्चेत असते. त्याचसोबत आता भर पडली आहे ती उर्फी जावेदची. आपल्या खास स्टाइलसाठी ओळखली जाणारी उर्फी जावेद अनेकांना आपल्या विचित्र फॅशननं सोशल मीडियावर घायाळ करत असते. अभिनेता रणवीर सिंगही कॉफी विथ करण 7 मध्ये उर्फीला स्टाईल आयकॉन म्हटले आहे. 

परंतु सध्या उर्फी आणि तिची मैत्रीण राखी सावंत सध्या भलत्याच एका कारणामुळे चर्चेत आहेत. राखीनं आपल्या खास मैत्रीणीबद्दल केलेलं वक्तव्य सध्या सगळीकडेच जोरात व्हायरल होत आहे. ती म्हणाली, “उर्फी को मीडिया में लाने वाली में हू, उससे पहले मीडिया में कहां थी वो. मेरी ही चेली है'' 

राखी सावंतच्या मते, तिच्यामुळे आज उर्फी लाईमलाईटमध्ये आली आहे. तिच्यापुर्वी तर राखी सावंत हे एकच नाव होतं. राखी सावंत पुढे म्हणाली, उर्फी ही माझ्या पावलांवर पाऊल टाकत पुढे जात आहे. पण तिने स्वतःच्या हिमतीवर आपलं करिअर घडवलं आहे. ती आपल्या क्षेत्रात फार चांगली कामगिरी करते आहे. रणवीर सिंगकडूनही उर्फीला शाब्बासकी मिळाली आहे. म्हणजे बघा", असं म्हणत तिनं उर्फीचं कौतुक केलं आहे. 

तिच्या या वक्तव्यावर नेटिझन्सनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकाने म्हटले आहे की आता राखी तर उर्फीच्या प्रसिद्धीवर जळायला लागली आहे. तर आता दुसऱ्यानं सांगितलं की राखीला आता हे असं मुद्दाम बोलण्याची वेळ आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परंतु अशा वक्तव्यांवरही राखीनं दुर्लक्ष केलं आहे आणि त्यावर ती म्हणाली, ट्रोलिंग तर सगळेच करत असतात परंतु आपल्याला ते काही गांभिर्याने घ्यायची गरज नाही. सगळे पुरूष उर्फीला शिव्या देतात तिच्या कपड्यांवरून.. परंतु हेच लोकं असतात जे तिचे फोटो गपचुप जाऊन तिचेच फोटो पाहतात.'' अशी टिकाही तिनं यावेळी केली.