दिग्दर्शक- राज शांडिल्य
निर्मिती- एकता कपूर
कलाकार- आयुषमान खुराना, नुसरत भारूचा, अन्नू कपूर, मनजोत सिंग आणि इतर...
'मै पुजा बोल रही हु, क्या हुआ आवाज अच्छी नही लगी...' असं म्हणत अभिनेता अयुषमान खुरानाचा 'ड्रीम गर्ल' रूपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. चित्रपटात 'करमवीर' ही व्यक्तिरेखा साकारत असलेला आयुषमानच्या आवाजाने सर्वांना वेड लावले आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या करमला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळते आणि सुरू होतो तो पूजाच्या आवाजाचा प्रवास. पूजा एक आणि तिचे चाहते अनेक असं चित्र चित्रपटात पाहायला मिळत आहे. समस्त कुटुंबासोबत पाहाता येण्यासारखा हा चित्रपट आहे. त्याचप्रमाणे आयुषमानचं अभिनय सुद्धा कौतुकास्पद आहे.
सुशिक्षित बेरोजगार असलेला आयुषमान खुराना काही पैंश्यासाठी नाटकात सितेची भूमिका साकारतो. त्यानंतर त्याला कौशल्याच्या जोरावर राजेश खन्नांच्या कॉल सेंटर मध्ये काम मिळते. कोणालाही माहित नसलेल्या पुजाच्या म्हणजे आयुषमानच्या प्रेमात अनेक लोक पडतात. आणि त्याच्या सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतात. आयुषमानच्या आवाजाच्या चाहत्यांच्या यादीत त्याचे वडील, त्याची गर्लफ्रेंड म्हणजे नुसरतचा भाऊ, पोलीस सुद्धा आहेत. तर तो नक्की लग्न कोणासोबत करेल हा मोठा प्रश्न आहे.
पोट धरून हासायला लावणाऱ्या चित्रपटाचे डायलॉग प्रचंड विनोदी आहेत. अतिशय चांगला स्क्रिन प्ले असणाऱा 'ड्रीम गर्ल' बिलकूल रटाळ नाही. चित्रपटांच्या गाण्यांना तर चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी 'ड्रीम गर्ल' चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन विश्वात पाय ठेवला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अप्रतिम आहे. त्याचप्रमाणे सर्व कलाकारांचे अभिनय सुद्धा मजेदार आहे.
एकंदरीत पाहता हा चित्रपट चाहत्यांचे उत्तम मनोरंजन करू शकेल. तर चित्रपटात एका पूजाने ज्याप्रकारे सर्वांना घायाळ केले. त्याचप्रमाणे चाहत्यांना ही पुजा तिच्या प्रेमात किती घायाळ करेल हे फक्त येणारा काळचं ठरवू शकेल. तर आता 'ड्रीम गर्ल' बॉक्स ऑफीसवर किती कोटी रूपयांपर्यंत मजल मारेल हे पाहाणं मजेदार ठरणार आहे.