लग्नाच्या 6 वर्षांनंतर ‘दृश्यम 2’ फेम अभिनेत्रीनं दिली Good News, फोटो शेअर करत म्हणाली...

Drishyam 2 fame Actress Pregnant : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Updated: Apr 1, 2023, 01:20 PM IST
लग्नाच्या 6 वर्षांनंतर ‘दृश्यम 2’ फेम अभिनेत्रीनं दिली Good News, फोटो शेअर करत म्हणाली...  title=
(Photo Credit : Ishita Dutta Instagram / Drishyam 2 Poster Facebook)

Ishita Dutta Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता (Ishita Dutta) ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. इशिताला ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) मध्ये तिनं साकारलेल्या भूमिकेसाठी तिला लोक ओळखतात. दरम्यान, इशितानं तिच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. इशिता गर्भवती असून लवकरच आई होणार आहे. इशितानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. इशितानं तिच्या चाहत्यांना दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर तिचे चाहतेही खूप आनंदी झाले आहेत. 

इशितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये इशितानं तिच्या पतीसोबत दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते समुद्र किनारी असल्याचे दिसत आहे. पहिल्या फोटोत इशिता उभी असून तिचा पती आणि अभिनेता वत्सल शेठ असून तो तिच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये वत्सल हा खाली बसलेला असून तिच्याकडे पाहत आहे. फोटोमध्ये इशिता आणि वत्सलनं मॅचिंड कपडे परिधान केले आहेत. इशिता आणि वत्सलच्या कपड्यांचा हिरवा रंग असल्याचे पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत इशितानं ‘बेबी ऑन बोर्ड’ असं कॅप्शन दिलं आहे. इशिता आणि वत्सलचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

पाहा फोटो - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इशिताच्या या फोटोवर कमेंट करत तिच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, भावा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत त्यांना खूप शुभेच्छा दिल्या आहेत. कीश्वर मर्चेंट, वाहबिज दोराबजी, रिद्धिमा पंडित, हेली शाह या सेलिब्रिटींनी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.इशितानं BT ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या प्रेग्नंसीवर वक्तव्य केलं आहे. 'आम्ही यासाठी तयार नव्हतो, पण आम्ही याचा विचार केला होता. प्रत्येक दिवस हा वेगळा आहे आणि शरिर एक वेगळा अनुभव घेतं. आम्ही बाळाविषयी असा विचार केला नव्हता. करिअरमध्ये सेटल झालो की हा विचार करायचा असं आम्ही ठरवलं होतं. ज्या प्रकारं लग्न हे आपल्या आयुष्यातील मोठी गोष्ट आहे त्या प्रकारे बाळ होणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. काम होत राहिल आणि आपण मेहनत तर करत राहू. पण आमचं बाळ हे आमच्या आयुष्यात एक नवीन चॅप्टर असेल,' असं इशिता म्हणाली.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Dasara ची 'भोला'ला जोरदार टक्कर, बॉक्स ऑफिसवर गल्ल्याचा आकडा पाहून व्हाल चकीत

दरम्यान, इशिता आणि वत्सलच्या लग्नाला 6 वर्षे झाले आहेत. लग्नाच्या सहा वर्षांनंतर त्यांनी गुडन्यूज दिली आहे. इशिता आणि वत्सल यांनी 2017 साली सप्तपदी घेतल्या होत्या. इशिता आणि वत्सलच्या आयुष्यात आलेल्या या आनंदाच्या क्षणानं सगळ्यांना आनंद झाला आहे. इशितानं ‘दृश्यम 2’ या चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती.