ड्रग्स कनेक्शन : NCBकडून दीया मिर्झाची होणार चौकशी

दीपिका, सारा, श्रद्धा, नम्रता या अभिनेत्रींचाही समावेश 

Updated: Sep 22, 2020, 07:16 PM IST
ड्रग्स कनेक्शन : NCBकडून दीया मिर्झाची होणार चौकशी

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच नाव ड्रग्स कनेक्शनमध्ये समोर येत आहे. आता दीपिका पाठोपाठ अभिनेत्री दीया मिर्झाचं नाव एनसीबीच्या रडावर आहे. लवकरच दीयाला चौकशीला बोलावलं जाऊ शकतं. 

मंगळवारी ड्रग्स कनेक्शनसंदर्भात चौकशी सुरू असताना एनसीबीने ४० वर्षाच्या अभिनेत्रीचं नाव या प्रकरणात असल्याचं म्हटलं. सारा अली खान, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि नम्रता शिरोडकर नंतर आता दीयाचं नाव समोर आलं आहे. एनसीबीकडून चौकशीकरता बोलवण्यात येऊ शकतं. 

NCB च्या सुत्राच्यां माहितीनुसार, अटकेत असलेल्या अनुज केशवानी आणि अंकुश या ड्रग्स पेडलर्स यांच्या चौकशीत या अभिनेत्रीचं नाव पुढे आलं आहे. या अभिनेत्रीची मॅनेजर तिच्यापर्यंत ड्रग्स पोहोचवत असेल. या अभिनेत्रीची मॅनेजर ड्रग्स पेडलर अनुजची गर्लफ्रेंड आहे.

२०१९ साली या अभिनेत्रीने ड्रग्स खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात मॅनेजरने ड्रग्स पेडलर्ससोबत दोनदा मिटिंग देखील केली होती. यामुळे येत्या काही दिवसांत अभिनेत्रीच्या मॅनेजरची चौकशी केली जाणार आहे. यानंतर या अभिनेत्रीला देखील NCB च्या चौकशीचा सामना करावा लागू शकतो.