'या' गंभीर आजारामुळे करण जोहर वयाच्या 50 व्या वर्षीही आहे अविवाहित; स्वत: केला मोठा खुलासा

चित्रपट निर्माता करण जोहर वयाच्या ५० व्या वर्षीही सिंगल आहे. पण तो अनेकदा त्याच्या नात्यामुळे चर्चेत असतो. 

Updated: Nov 16, 2022, 05:04 PM IST
'या' गंभीर आजारामुळे करण जोहर वयाच्या 50 व्या वर्षीही आहे अविवाहित; स्वत: केला मोठा खुलासा title=

मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहर वयाच्या ५० व्या वर्षीही सिंगल आहे. पण तो अनेकदा त्याच्या नात्यामुळे चर्चेत असतो. आता खुद्द करण जोहरने आपल्या नात्याबद्दल उघडपणे सांगितलं आहे. तो अजूनही अविवाहित का आहे हे त्याने सांगितलं आहे.

करण जोहर त्याच्या नात्याबद्दल काय म्हणाला?
ट्विक इंडियामध्ये ट्विंकल खन्नासोबत बोलताना करण जोहर म्हणाला की, ''ज्यांना त्याच्या भावना समजत नाहीत अशा लोकांचा पाठलाग करण्याचा तो एक पॅटर्न फॉलो करू लागला. सर्व प्रयत्न करूनही हा प्रश्न सोडवण्यात तो अपयशी ठरला. यासोबतच करण जोहर म्हणाला की, त्याला आता फक्त आई आणि मुलांसाठीच असं वाटतंय की, आयुष्यात पुन्हा कोणाला आणायचं नाही.'' असंही करण जोहर या मुलाखतीत म्हणाला.

''मी 50 वर्षात कोणत्याही ठोस नात्यात नाही. असं अनेकदा झालं जेव्हा मला असं वाटलं की, मी रिलेशनशिपमध्ये येऊ शकेन. पण असं कधीच झालं नाही. रिलेशनशिपपासून पळून जाणारा मी पहिला असायचो. मला असही वाटतं की, मी या विभागात खूप गोंधळलो आहे. असं करण यावेळी म्हणाला. 

करण जोहरने डॉक्टरांची भेट घेतली 
करण जोहरने असंही सांगितलं की, तो अशा लोकांच्या प्रेमात पडतो जे त्याला फारसे महत्त्व देत नाहीत. ''जेव्हा कोणी माझ्या जवळ येतं तेव्हा मी निघून जातो. ही एक मोठी समस्या आहे. याबाबत मी डॉक्टरांशीही बोललो आहे. मी अशी व्यक्ती का आहे ज्याला माझ्या आयुष्यात प्रेमाची गरज नाही यावर मी सत्रं देखील घेतली आहेत.

करण जोहर प्रेमापासून का दूर राहिला?
करण म्हणाला, ज्या क्षणी प्रेम तीव्र होऊ लागतं मला असं वाटतं की, कोणीतरी मला कैद केलं आहे. त्या पिंजऱ्यातून बाहेर पडावंसं वाटतं. पण जेव्हा माझ्याकडे प्रेम नसतं तेव्हा मी त्याचा पाठलाग करू लागतो. करण जोहरने असंही सांगितलं की, त्याच्या लहानपणापासून अनेक समस्यांनी त्याच्या आयुष्यावर परिणाम केला आहे.

वरुण धवनने वाईट काळात साथ दिली
करण जोहरने याआधी 'कॉफी विथ करण' या शोमध्ये त्याच्या लव्ह लाईफबद्दल सांगितलं होतं. चॅट शोचा पाहुणा वरुण धवन आणि अनिल कपूर यांच्याशी संवाद साधताना त्याने सांगितलं होतं की, तो सध्या सिंगल आहे. त्याचं ब्रेकअप झालं आहे. यावेळी करण जोहरनेही वरुण धवनचं कौतुक केलं होतं. करण जोहरने पुढे सांगितलं की, ब्रेकअपच्या वाईट काळात वरुण धवनने त्याला साथ दिली.

भलेही चित्रपट निर्मात्याची लव्ह लाईफ अपूर्ण राहिली असेल, मात्र तो आता त्याच्या मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहे. करण जोहर त्याची मुलं रुही आणि यश यांच्या खूप जवळ आहे आणि अनेकदा त्यांच्यासोबत तो दिसतो.