Entertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार?

अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला असून चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 12, 2023, 10:10 PM IST
Entertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार? title=

OMG 2 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) लवकरच 'OMG 2' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारबरोबर पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. पण ट्रेलर रिलीझ झाल्यापासून हा चित्रपट वादात अडकला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारला भगवन शंकराच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटातील एका दृष्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भगवान शंकर रेल्वेच्या पाण्याने रुद्राभिषेक करताना दाखवण्यात आलं आहे. 

चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात
आता चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. अक्षय कुमारचा 'OMG2' हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या (Censor Board) कचाट्यात अडकला आहे. सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट रिव्ह्यू कमेटीकडे (Review Committee) पाठवला आहे. चित्रपटातील काही दृष्य आणि संवादावर आपत्ती दर्शवण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. पण आता चित्रपट रिव्ह्यू कमिटीकडे गेल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

2012 मध्ये ओह माय गॉड (oh my god) या चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमारने भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. तर परेश रावल यांनी देवाविरुद्ध केस करणाऱ्या नास्तिक कांजीलाल मेहताची भूमिका केली होती. आता या चित्रपटाचा सिक्वल आला असून OMG2 चित्रपटात अक्षय कुमार भगवान शंकराच्या रुपात दिसणार आहे. तर अरुण गोविल (Arun Govil) श्री रामाची भूमिका साकारणार आहेत. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील लोकप्रिय अभिनेते अरुण गोविल पुन्हा एकदा रामाच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहते त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

याशिवाय चित्रपटात यामी गौतमी प्रमुख अभिनेत्री आहे. पण OMG च्या सिक्वलमध्ये परेश रावल (Paresh Rawal) दिसणार नाहीएत. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत परेश रावल यांनी आपल्याला OMG2 चित्रपटाची कथा आवडली नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आपण या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्याचं परेश रावल यांनी स्पष्ट केलं होतं. एखाद्या चित्रपटाचा सिक्वल बनवायचा असेल तर तो 'लगे रहो मुन्नभाई' किंवा 'हेरा फेरी' यासारख्या चित्रपटांसारखा बनायला हवा, असं सांगत परेश रावल यांनी या चित्रपटातील भूमिका नाकारली. 

गदर2 ची टक्कर
अक्षय कुमारच्या 'OMG2' ला सनी देओरच्या 'गदर2' ची कडवी टक्कर असणार आहे. 'गदर2' हा चित्रपटही 11 ऑगस्टला देशभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याआधी 'OMG' आणि 'गदर' चित्रपट प्रदर्शित झाले होते, त्यावेळी दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. आता या चित्रपटांच्या सिक्वलबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.