वाढत्या वयामुळे हिणवलं, आता 40 व्या वर्षीही बॉलिवूडच्या फेमस ब्रिटिश गायिकेनं शेअर केला Bold Photo

Sophie Choudry: या अभिनेत्री-गायिकेला एकेकाळी तिच्या वाढत्या वयामुळे ट्रोलर्सकडून हिणवलं गेलं होतं. आता तिनं वयाच्या 40 व्या वर्षीही बोल्ड फोटो शेअर केला आहे. 

Updated: Jan 6, 2023, 07:51 PM IST
वाढत्या वयामुळे हिणवलं, आता 40 व्या वर्षीही बॉलिवूडच्या फेमस ब्रिटिश गायिकेनं शेअर केला Bold Photo  title=

Sophie Choudry: सध्या अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचा बोल्डनेस (Actress Bold Photos) पाहून भल्याभल्याचीही झोप उडते. सोशल मीडियाचा सगळ्यांनाच एक्सेस असल्यानं आता सगळ्यांनाच सगळ्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स कळतात. त्यामुळे आपल्यालाही कुठले सेलिब्रेटी कुठे फिरतात आणि काय करतात याची सगळी माहिती कळते. सध्या अशाच एका अभिनेत्री-गायिकचा फोटो (Instagram Photos) सगळीकडेच व्हायल होतो आहे. हा फोटो पाहून भल्याभल्यांची झोप उडाली आहे. या फोटोतला तिचा किलर बिकीनी (Bikini Look) लुक सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. एकेकाळी या गायिकेला तिच्या वाढत्या वयामुळे नेटकऱ्यांनी हिणवले होते परंतु आज हिच अभिनेत्री तिच्या वयाला न जुमानता आत्मविश्वासानं सगळ्यांसमोर वावरते आहे. त्यामुळे सगळेच तिच्या या नव्या लुकची प्रशंसा करताना दिसत आहेत. (entertainment gossip actress sophie chodary share bikini photo on instagram goes viral)

सोफी चोधरी (Sofie Choudary) असं या अभिनेत्रीचं नाव आहे. सोफीचा जन्म हा इंग्लंडमधला (England) आहे परंतु तिनं बॉलिवूडमध्ये मोठे नाव कामावले आहे. तिचे म्यूझिक व्हिडीओज हे खूपच व्हायरल होत असतात. सोफी ही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सध्या तिचे असेच काही फोटोज सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. त्यापैंकीच हा एक फोटो आहे. या फोटोत ती तिचा बिकीनी लुक फ्लॉन्ट (Bikini Look Flaunt) करताना दिसते आहे. नव्या वर्षातला हा तिचा बोल्ड लुक पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोत ती एका बीचवर उभी आहे. तिच्या आजूबाजूला पाणी फिरताना दिसतं आहे. सध्या ती समर वेकेशन एन्जॉय करताना दिसते आहे. यावेळी तिनं पिंक कलरची बिकीनी घातली होती. या लुकमध्ये ती फारच ग्लॅमरस (Beach Photos of Actresses) दिसत होती. 

सोफी वयाच्या 40 व्या वर्षीही खूप जास्त बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. ती एकदा चर्चेत असते. मध्यतंरी नेटकऱ्यांनी तूझं वय वाढू लागलं आहे आता तू तुझ्या वयाप्रमाणे वाग, असे मेसेजच येऊ लागले होते असं ती म्हणाली होती. त्यावेळी आपल्या वाढत्या वयावरून हिणवलं गेल्याचंही तिनं सांगितलं होतं. अनेकदा अभिनेत्रींना त्यांच्या वाढत्या वयावरून हिणवले गेले आहे. याआधी करिना कपूरलाही (Kareena Kapoor Trolled) यावरून हिणवलं गेलं होतं. त्यात मलायका अरोराचाही समावेश होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परंतु अनेकदा ट्रोलिंगच्या शिकार झालेल्या या अभिनेत्री आज ठराविक वय ओलांडल्यानंतरही खूप ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहेत. त्यामुळे ट्रोलिंगच्या कितीही शिकार झाल्या तरी वय हा तर फक्त आकाडा आहे असंच या अभिनेत्रींकडे बघून पाहावं लागेल.