राखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री... म्हणते 'हे' काम पहिलं करायचंय

'आपले मोदीजी चहा बनवता बनवता पंतप्रधान बनले, तर मी...' 

Updated: Oct 7, 2022, 07:41 PM IST
राखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री... म्हणते 'हे' काम पहिलं करायचंय title=

Entertainment News : एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय असते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुनही ती नेहमीच चर्चेत असते. अनेक विषयांवरही ती आपलं मत मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वीच राजकारणात प्रवेश करण्यावरुन तिने वक्तव्य केलं होतं. आता राखी सावंतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तीने आपल्या मुख्यमंत्री बनण्याच्या स्वप्नाविषयी सांगितलं आहे. आपण मुख्यमंत्री झालो तर कोणती गोष्ट पहिली करु याविषयी तिने आपलं मत मांडलं आहे

'पहिली गोष्ट ही करणार'
राखी सावंतचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न आहे. कोणत्याही राज्याची मुख्यमंत्री झाले तर पहिलं राज्यातील रस्ते गुळगुळीत करु असं तीने म्हटलंय. हेमामालिनीच्या (Hema Malini) गोऱ्या गोऱ्या गालांसारखा रस्ते बनूव. ड्रीम गर्ल जितकी सूंदर आहेत तितकेच राज्यातील रस्ते सूंदर असतील असं राखी सावंतने म्हटलंय. इतकंच नाही तर यापुढे जाऊन ती म्हणते, आपले मोदीजी चहा बनवता बनवता पंतप्रधान बनले, तर मी हसता हसता मुख्यमंत्री का बनू शकत नाही?

हेमा मालिनीने केलं होतं वक्तव्य
काही दिवसांपूर्वीच हेमा मालिनी यांना कंगना राणौत (Kangana Ranut) निवडणूक लढविण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. कंगना रणौत मथुरेतून निवडणूक लढवणार आहे का? असा हा प्रश्न होता. या प्रश्नावर हेमा मालिनी भडकल्या होत्या, मीडियाचे लोक उद्या राखी सावंतच नावही पुढे करू शकतात असं हेमा मालिनी यांनी उपरोधिकपणे म्हटलं होतं. 

राखी सावंत हिचं उत्तर
हेमा मालिनी यांच्या या वक्तव्यावर राखी सावंतने प्रतिक्रिया दिली होती. खरंतर 2022 मध्ये निवडणूक लडवणार आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह याबाबतची घोषणा करणार होते, पण सौभाग्य आहे की हेमा मालिनी यांनीच आधी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली, असा टोला राखा सावंतने लगावला.