'तो' आम्हाला मारुन टाकेल, सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना 'या' व्यक्तीची भीती... तुरुंगात मागितली सुरक्षा

Entertainment : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या मुंबईतल्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या दोन आरोपींना अटक करण्यात आलं आहे. आता या दोन आरोपींनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 3, 2024, 06:28 PM IST
'तो' आम्हाला मारुन टाकेल, सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना 'या' व्यक्तीची भीती... तुरुंगात मागितली सुरक्षा title=

Entertainment : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या मुंबईतल्या वांद्रे इथं असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट (Galaxy Apartment) या घरावर गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली होती. 14 एप्रिल रोजी मोटरसायकवरुन आलेल्या दोघांनी पहाटेच्या वेळी सलमानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या (Lawrence Bishnoi) विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोन आरोपींना अटक केली. आता या दोघांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. विक्रीच्या भावने पत्र लिहित गृहमंत्रालय, डीजीपी, बिहार सरकार आणि जेल अधीक्षकांकडे तुरुंगात दोघांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

विकी आणि सागरच्या जीवाला धोका?
सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांना दाऊद कंपनी अर्थीत डी कंपनीची (D Company) भीती वाटतेय. डी गँगचे काही गुंड तुरुंगात असून आपल्याला मारण्याचा कट आखत असल्याचं आरोपींनी म्हटलं आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबाराची घटना घडल्यापासून डी गँग नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळेच याचा बदला घेण्यासाठी डी गँगचे तुरुंगात असलेले गुंड आक्रमक झाल्याची माहिती आहे. 

काही दिवसांपूर्वी विक्की गुप्ताचा भाऊ साहेह शाह गुप्ता त्याला भेटायला तुरुंगात गेला होता.यावेळी विक्कीने तुरुंगात आपल्या जीवाला धोका असल्याचं भावाला सांगितलं. डी गँगचे गुंड आपल्याला जीवे मारण्याचा प्लान बनवत असल्याचं विक्कीने सांगितलं. 

गोळीबाराच्या घटनेने नाराज
विक्रीच्या तक्रारीनंतर साहेब शाह गुप्ताने एक पत्र लिहून विक्की आणि सागरला तुरुंगात सुरक्षेची मागणी केली आहे. डीजीपी महाराष्ट्र, होम मिनिस्ट्री, गृह मंत्रालय, जेल अधीक्षक आणि बिहार सरकार यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणी तात्काळ कारवाईची मागणीही या पत्रातून केली आहे. 

पत्रात काय लिहिलंय?
दाऊद गँगचे काही गुंड तुरुंगात असून ते विक्की आणि सागरला मारण्याचा कट आखत आहेत असं या पत्रात नमुद करण्यात आलं आहे. या पत्रात सलमान खानवरही आरोप करण्यात आले आहेत. त्याने आपल्या प्रसिद्धीचा वापर करत तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आहे. चार्जशीटमध्ये काही अतिरिक्त गुन्हे दाखल जोडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या पत्रात विक्की गुप्ता आणि सागर हे गुन्हेगारी वृत्तीचे नसल्याचं म्हटलं आहे. विक्की आणि सागरचं कुटुंब त्या दोघांवरच अवलंबून आहे. त्यामुळे तुरुंगात योग्य ती सुरक्षा पुरवावी असं लिहिलं आहे. 

काय आहे चार्जशीटमध्ये
पोलिसांनी अटक केलेल्या या 5 आरोपिंविरोधात 350 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. त्या चार्जशीटमध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहेत. पोलिसांनी चार्जशीटमध्ये म्हटलं की सलमानच्या हत्येचा प्रयत्न करणारे आरोपी हे पाकिस्तानमधून मॉडर्न कारतुस  आणि त्यासोबत एके 47, एके 92 आणि एम 16 आणि तुर्कीत निर्मित करण्यात येणारं जिगाना हे कारतुस खरेदी करण्याची त्यांची तयारीत होते. अशा प्रकारच्या शस्त्रांनी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती.