Entertainment चा तडका, OTT वर गाजलेल्या 'या' मालिकेचा तिसरा सीझन येतोय

चाहते ‘फोर मोर शॉट्स प्लीज’च्या तिसरा सीझन ला घेऊन फारच उत्सुक दिसत आहेत. 

Updated: Oct 7, 2022, 08:11 PM IST
Entertainment चा तडका, OTT वर गाजलेल्या 'या' मालिकेचा तिसरा सीझन येतोय title=
Entertainments Tadka the third season of the popular OTT series coming nz

Four More Shots Please Season 3: सध्या सगळ्यांनाचा ओटीटी वरील सीरिजचे वेड आहे. अनेक लोकांना चित्रपटांपेक्षा सीरिज पाहायला आवडतात. अशीच एक बहुचर्चित वेबसीरीज ‘फोर मोर शॉट्स प्लीज’चा तिसरा सीझन (Four More Shots Please Season 3) लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सीरिजने 2 सीझनमध्ये  चाहत्यांना भलतंच वेड लावले होते. येणारा सीझन ही चाहत्यांचे मनोरंजन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. चाहते ‘फोर मोर शॉट्स प्लीज’च्या तिसरा सीझन ला घेऊन फारच उत्सुक दिसत आहेत. (Entertainments Tadka the third season of the popular OTT series coming nz)

ही सीरिज येत्या 21 ऑक्टोबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज होईल. ही सीरिज भारत आणि आणखी 240 देशात प्रसारित होणार आहे. सीझन 3 मध्ये स्टार्स कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari), सयानी गुप्ता (Sayani Gupta), मानवी गाग्रू (Manavi Gagru) आणि बानी (Bani) हे मुख्य भूमिकेत असतील.

आणखी वाचा - Rekha : रेखाच्या नवऱ्याने का संपवल आयुष्य...चिठ्ठीत लिहिलं होतं 'ते' कारण...

या चार अभिनेत्रींशिवाय प्रतीक बब्बर (Pratik Babbar), लिसा रे (Lisa Ray), नील भूपलम (Neel Bhupalam), राजीव सिद्धार्थ (Rajeev Siddharth), अमृता पुरी (Amrita Puri), सिमोन सिंग (Simon Singh) आणि समीर कोचर (Sameer Kochhar) पुन्हा एकदा आपापल्या भूमिका साकारत आहेत. याशिवाय जिम सरभ, रोहन मेहरा, शिल्पा शुक्ला आणि सुशांत सिंग हे देखील बहुचर्चित मालिकेच्या नवीन सीझनमध्ये दिसणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जोयीता पटपटिया यांचे दिग्दर्शन, देविका भगत यांचे लेखन आणि इशिता मोईत्रा यांचे संवाद असलेली ही बहुचर्चित अॅमेझॉन ओरिजिनल सीरिजने दुसऱ्या सीझनमध्ये चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन (Entertainment) केले होते. त्या चौघींनी स्वत:चे आयुष्य कोणाच्याही दबावाखाली न येता जगणे, त्यांचे घेतलेले निर्णय, त्यांनी केलेल्या चूका या सगळ्या गोष्टी सीझन 2 मध्ये दाखवण्यात आल्या होत्या.

आणखी वाचा - Sunny Leone : जुन्या रंगात पुन्हा दिसली सनी लियोनी... चाहत्यांना म्हणतात...

 पुन्हा एकदा त्यांचे स्वातंत्र्य पडद्यावर दाखवले जाईल कारण ते जीवनाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात, प्रेम सामायिक करतात, मोठ्या चुका करतात आणि या मुंबई शहरात त्यांची मैत्री खरोखर काय टिकते हे शोधण्याचा प्रयत्न करतात. मागच्या 2 सीझनप्रमाणे येणारा सीझन चाहत्यांना निराश करणार नाही असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.