मुंबई : सिनेसृष्टीत कोणतीही गोष्ट सहज आणि सोपी मिळत नाही. अनेकदा नाव कमावण्याच्या नादात कलाकारांना खूप मोठी गोष्ट गमवावी लागते. अनेकदा कलाकार अशा गोष्टींचा उल्लेख करतात. जे ऐकून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसतो. असाच एक धक्कादायक किस्सा अभिनेत्री ईशा गुप्ताने शेअर केला आहे. ईशा गुप्ता अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीचा एक भाग आहे. ईशाने सांगितले की, एकदा दिग्दर्शकाने तिला शिवीगाळ केली होती. महत्वाचं म्हणजे तिने ही परिस्थिती अगदी आरामात हाताळली होती.
ईशा गुप्ता म्हणाली की, जेव्हा दिग्दर्शकाने मला शिवीगाळ केली तेव्हा मी सेटच्या बाहेर गेले. जोपर्यंत दिग्दर्शकाने माफी मागितली नाही तोपर्यंत ईशा सेटवर आलीच नाही. दोन दिवसांनंतर दिग्दर्शकाने माफी मागितली. एकदा माझ्या कपड्यात काही तरी बिघाड होता. मात्र मला सांगण्यातच आला नाही. जेव्हा मी सेटवर पोहोचली तेव्हा दिग्दर्शकाने माझा छळ करण्यास सुरूवात केली. त्यांना वाटलं की, मी मुद्दाम उशिरा आली.
बॉलीवूड बबलसोबत बोलताना ईशा म्हणाली, "दिग्दर्शकाने मला हिंदीत काहीतरी सांगितले आणि मी त्याला पाहिले. तो म्हणाला की तुला उशीर झाला. मी शांत राहिलो, कारण मी शांत राहण्यातच विश्वास ठेवते. तेव्हा मी उशिरा न आल्याच सांगितलं. माझ्या कपड्यांमध्ये बिघाड होता. यामध्ये माझी चूक नाही. दिग्दर्शकाने पुन्हा एकदा ईशाला अब्यूज केलं. त्यावर ईशाची प्रतिक्रिया खूप स्पष्ट होती. 'पहिल्यांदा मी शांत राहिले. मात्र दुसऱ्यांदा मी उलटून उत्तर दिलं.'
त्यानंतर ईशा गुप्ता तिच्या गाडीतून निघून गेली. ईशा म्हणाली की मी माझ्या कारमध्ये बसताच मला कार्यकारी निर्माते आणि निर्मात्यांचे कॉल येऊ लागले. ते ईशाची माफी मागू लागले. मात्र ईशाला दिग्दर्शकाकडून माफी मागण अपेक्षित होतं. दिग्दर्शकाने ईशाची तब्बल दोन दिवसांनी माफी मागितली.