'आर्यन अगदी त्याच्या वडिलांसारखाचं...' शाहरुखच्या मॅनेजरची पोस्ट व्हायरल

आर्यन खान वादाच्या भोवऱ्यात; शाहरुखची मॅनेजरच्या पोस्टनंतर मात्र सर्वत्र चर्चा

Updated: Oct 28, 2021, 08:05 AM IST
'आर्यन अगदी त्याच्या वडिलांसारखाचं...' शाहरुखच्या मॅनेजरची पोस्ट व्हायरल

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. ड्रग्स प्रकरणात तो 2 ऑक्टोबरपासून तुरूंगात आहे. दरम्यान आर्यनला जामीन मिळावा म्हणून शाहरुख आणि गौरी खान सतत प्रयत्नात आहेत. वकील देखील न्यायालयात युक्तीवाद करताना दिसत आहेत. अशात आज आर्यनसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. आज आर्यनला जामीन मंजूर होईल की त्याची कोठडी आणखी वाढेल याकडे  सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या कठिण प्रसंगी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी सतत चर्चेत आहे. दरम्यान पूजाची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

पूजाची सध्या व्हायरल होत असलेली पोस्ट 2019 सालची आहे. पोस्टमध्ये पूजा आर्यनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. आर्यनचा फोटो पोस्ट करत आर्यन त्याच्या वडिलांसारखा समजदार आहे असं पूजा म्हणाली आहे. आर्यन सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळे संपूर्ण खान कुटुंब अडचणीत आहे. अशात  पूजा खान कुटुंबासोबत खंबीरपणे उभी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पोस्टमध्ये पूजा म्हणते, 'आर्यन त्याच्या वडिलांसारखा समदजार आहे. आईसारखं तेज आहे आणि सेन्स ऑफ ह्यूमर आहे. एक साधा मुलगा आहे. त्याचं मन योग्य ठिकाणी आहे. सर्वात लाडक्या आर्यनला वाढदिवसाच्या शुभेच्छा....' पूजाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

पूजा ददलानी 2012 पासून शाहरुख खानची मॅनेजर आहे. जवळपास एक दशकापासून पूजा कुटुंबासोबत काम करत आहे. पूजाचे गौरी खानसोबत खूप चांगले नाते आहे. अब्राम खान, सुहाना खान आणि आर्यन खानसोबतही पूजाचे बाँडिंग कोणापासून लपलेले नाही. आर्यन खानला अटक झाल्यापासून पूजा ददलानी एनसीबी ऑफिसपासून कोर्टापर्यंत दिसत आहे.