'आश्रम 3' फेम ईशा गुप्ताचा नो मेकअप लूक करतोय चाहत्यांना घायाळ

ईशा गुप्ता 'आश्रम 3' वेब सीरिजमुळे सतत चर्चेत असते. 

Updated: Jun 1, 2022, 09:38 PM IST
'आश्रम 3' फेम ईशा गुप्ताचा नो मेकअप लूक करतोय चाहत्यांना घायाळ title=

मुंबई : ईशा गुप्ता 'आश्रम 3' वेब सीरिजमुळे सतत चर्चेत असते. दरम्यान, ती सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकत आहे की, ज्याने ती चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी ईशा गुप्ताने कुत्र्यासोबतचा असा फोटो शेअर केला आहे की, लोकांच्या नजरा तिच्या चेहऱ्यावरून काढणं कठिण होत आहे.

कुत्र्यासोबत काढला फोटो
ईशा गुप्ताने ब्रुनोसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ब्रुनो ईशा गुप्ताकडे पाहत आहे आणि अभिनेत्री देखील ब्रुनोकडे टक लावून पाहत आहे.

अभिनेत्री मेकअपशिवाय दिसली
या फोटोत ईशा गुप्ता मेकअपशिवाय दिसत आहे. अभिनेत्रीचे केस मोकळे आहेत. यावेळी अभिनेत्री नो मेकअप लूकमध्ये दिसली.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शेअर केला स्वत:चा फोटो 
हा फोटो स्वतः ईशा गुप्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो शेअर करत ईशा गुप्ताने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आम्ही ब्रुनोबद्दल बोलत नाही.'