Ex Miss World Contestant Passes at 26 of Cancer : माजी मिस वर्ल्ड स्पर्धक शेरिका डी अरमासचं 13 ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. शेरिकानं वयाच्या 26 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शेरिकानं 2015 मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड ब्यूटी पेजंटमध्ये उरुग्वेचे प्रतिनिधित्व केले होते. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या एकावृत्तानुसार, शेरिका ही दोन वर्षांपासून कॅन्सरचा सामना करत होती. त्यासाठी ती कीमोथेरेपी आणि रेडियोथेरेपी ट्रीटमेंट देखील घेत होती. दरम्यान, इतक्या कमी वयात तिचे निधन झाल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
शेरिका डी अरमासचा भाऊ मयक डी अरमासनं बहीण शेरिकाला श्रद्धांजली वाहत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत मयक म्हणाला की लहाण बहीणी त नेहमी आणि कायमस्वरूपी उंच झेप घे. ती या जगाला खूप चांगल्या प्रकारे समजायची. माझ्या आयुष्यात आजपर्यंत भेटलेल्या सगळ्यात सुंदर महिलांपैकी ती एक होती.
हेही वाचा : बाथ टॉवेलमध्ये फाईट करणारी कतरिना, हवेत उडणारा 'भाई' अन् बरंच काही… Tiger 3 चा Trailer तुम्ही पाहिलात का?
दरम्यान, 2021 च्या मिस उरुग्वे या ब्युटी पेजेंटची विजेता लोला डी लॉस सेंटोसनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या कुटुंबाच्या दु:खात असल्याचे सांगत म्हटले की 'मी तुला नेहमी लक्षात ठेवेन, फक्त तू दिलेल्या पाठिंब्यासाठी नाही तर तुला मला किती पुढे जाताना पाहिजे होत, तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या आनंदासाठी आणि तुझ्या त्या मित्रांसाठी जे आपले कॉमन फ्रेंड आहेत आणि ते आजही माझ्यासोबत आहेत.'
शेरिका डी अरमास 2015 मध्ये चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड या ब्युटी पेजंटमध्ये टॉप 30 मध्ये नव्हती. तर या ब्युटी पेजंटमध्ये सहभागी होणाऱ्या फक्त 6 ज्या 18 वर्षांच्या मुली होत्या त्यांच्या पैकी एक होती. शेरिकानं त्यानंतर मेकअप लाइन देखील लॉन्च केले आणि शे डे अरमास स्टु़डियो देखील सुरु केला होता. या ठिकाणी केस आणि पर्सनल केअरचा सगळा सामान मिळत होता.
एका मुलाखतीत शेरिका म्हणाली होती की, 'मला सुरुवातीपासून मॉडेल व्हायचे होते, मग ते सौंदर्य मॉडेल असो, जाहिरात करणारी मॉडेल असो किंवा कॅटवॉक मॉडेल असो. मला फॅशनशी संबंधित प्रत्येक गोष्ट आवडते आणि सौंदर्य स्पर्धां तसचं मिस युनिव्हर्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हे कोणत्याही मुलीचे स्वप्न असते. आव्हानांनी भरलेला हा अनुभव मला जगता आल्याने मला खूप आनंद होत आहे'