Exclusive : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत येणार नवं वादळ

मालिकेबाबतची महत्त्वाची माहिती वाचली का? 

Updated: Oct 22, 2020, 09:52 AM IST
Exclusive : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत येणार नवं वादळ

मुंबई : 'रं मर्दा...' असं म्हणत राणा दा आणि पाठकबाईंची प्रेमकहाणी, त्या दोघांच्या जीवनातील प्रसंग, या कहाणीतील आव्हानं असं सारं कथानक घेत काही वर्षांपूर्वी 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पाहता पाहता अस्सल मराठमोळा बाज असणाऱ्या या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यही गाजवलं. ज्यानंतर आता मध्येच या मालिकेबाबतची चर्चा एका वेगळ्या कारणामुळं रंगू लागली. 

झी मराठीवरील ही अतिशय लोकप्रिय मालिका प्रेक्षांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं गेलं. पण, मुळात तसं नाही. उलटपक्षी या मालिकेत आता एक नवं वळण येणार असल्याचं म्हटलं जात आहे. हे वळण म्हणण्यापेक्षा एक वादळच मालिकेत येणार आहे. 

कारण, कथानकामध्ये खलनायकी बाजू ताकदीनं पकडणारं 'नंदिता' हे पात्र मालिकेत पुन्हा एकदा परतणार आहे. आता ही 'नंदिता' कोण, कशी आणि केव्हा परतणार याची माहिती येत्या काही दिवसांमध्ये समोर येईल. शिवाय कथानकातून ही बाब उलगडत जाणारच आहे. पण, आता उत्सुकता आहे ती म्हणजे नंदिचाच्या कमबॅकची. 

ज्याप्रमाणं या मालिकेतील मुख्य भूमिका मिळालेल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळाली, त्याचप्रमाणं खलनायकी भूमिकेत अर्थातच 'नंदिता' किंवा 'वहिनीसाहेब' साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगावकर हिलाही प्रेक्षकांनी दाद दिली. तिनं उभी केलेली ही भूमिका आणि या भूमिकेचा ठसकेबाद अंदाज सर्वांच्याच मनात घर करुन गेला. ज्यानंतर तिनं मालिकेतून काढता पाय घेतला होता. 

Watch Tuzhat Jeev Rangala Jul 23, 2019 Full Episode - Online in HD | ZEE5

 

धनश्रीनं मालिका सोडल्यानंतर आता, तिनं साकारलेल्या पात्राचा पुन्हा एकदा प्रवेश होणार आहे. पण, त्याबाबतची सविस्तर माहिती मात्र अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. तेव्हा आता मालिका बंद होणार नाही, हे नक्की असून यातील नवं वादळ नेमकं कसं आणि कोणत्या स्वरुपाचं असणार याकडेच सर्वांच्या नजरा असतील.