'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री देतेय Breaking News

ब्रेकिंग न्यूज म्हटलं की...

Updated: Oct 22, 2020, 09:42 AM IST
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री देतेय Breaking News

मुंबई : अलिकडे ब्रेकिंग न्यूज म्हटलं की प्रत्येकाच्या मनात धडकी भरते, कशा संदर्भात न्यूज आहे. त्याचा आपल्या जीवनावर काही परिणाम होणार तर नाही न... असे अनेक प्रश्न एका क्षणांत उभे राहतात. ब्रेकिंग न्यूज असेल तर निवेदक कशाप्रकारे ती बातमी जनतेसमोर सादर करतो. त्याचे हाव-भाव इत्यादी गोष्टी लक्षात घेत. सर्वांसमोर 'ब्रेकिंग न्यूज' येते. कोरोना व्हायरसमुळे सध्या लाखो कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर वृत्तनिवेदक वर्क फ्रॉम होम करू लागले तर ते कशाप्रकारे बातम्या देतील. यावर भाष्य करणारी 'नो ब्रेकिंग न्यूज' ही वेब मालिका "व्हायरस मराठी"वर सुरू झाली आहे.